तुज आठवांचे

Started by शिवाजी सांगळे, July 31, 2021, 05:59:23 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तुज आठवांचे

क्षणात स्फुरते क्षणात स्मरते
तुज आठवांचे मग गाणे होते

मनी घोळता उमाळे तुज स्मृतींचे
ओसंडूनी येती भाव मज मनीचे
विस्मरावे कसे कळेना गुज प्रेमाचे
वेळी अवेळी मन उगा बावरते
हलकेच हळूवार नेत्र पाणवते...१
तुज आठवांचे...

आयुष्याचे सगळे हिशोब फसले
रस्तेच आपले जेव्हा विलग झाले
सारेच अवघड आता जगणे आले
सावरावे तोवर मन पुन्हा गुंतते
सांग तुलाही का हे कोडे पडते...२
तुज आठवांचे...

दिल्या घेतल्या त्या सऱ्या वचनांचे
रेखाटले चित्र मी भेटल्या स्थळांचे
मलाच उरे ना त्यात भान स्वतःचे
भावनांचे कुठवर हे खोडावे नाते
उचंबळून येता मन चिंबचिंब होते...३
तुज आठवांचे...

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९