"गण गवळण"-"वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी"

Started by Atul Kaviraje, July 31, 2021, 06:18:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून मी "गण गवळण" हा तमाशातील पारंपरिक  प्रकार  तुम्हांपुढे सादर करीत आहे.   

      गवळण हा तमाशातील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये गणानंतर गवळण सादर करण्याची प्रथा आहे.

     गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. यातील विनोदाचा आणि मार्मिकतेचा भाग मावशी हे पात्र करते. मावशी म्हणजे एक पुरुष कलाकारच असावा लागतो. हा कलाकार सोंगाड्या असतो. यात या भागात कृष्णाची खूप चेष्टा केलेली असते. त्या निमित्ताने अध्यात्मिक चर्चादेखील घडवून आणली जाते.

     ही गवळणही पारंपरिक पद्धतीने राधाकृष्णाच्या शृंगारलीला नृत्य, नाट्य, संगीत या घटकांनी सादर केली जाते. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असे स्वरूप असल्याचे दिसते. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कारही करते. गण-गवळण हे देवाचे जागरण किंवा गोंधळ या प्रकारातही दिसून येते.



        (साभार आणि सौजन्य-विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
      ---------------------------------------------------


                                "गण गवळण"
                                  पहिले पुष्प
                               -------------

                       "वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
                        वेडी झाली राधा ऐकून बासरी"
                     ------------------------------ 


वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वेडी झाली राधा ऐकून बासरी.

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.

नाता मधली मी नार गौळयाच्या घरची
धडकी एक ही उरा नित्य सासरची
तरी माया कमीच ना होई तुझ्या वरची
जादू काय ही मला केलि मना वरती
     भेटी साठी नाचे मनात मयूरी,
          वेडी झाली राधा ऐकून बासरी...

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.

झोप  नयनांची  गेली  हरपून  गेले  भान
तन  मन ध्यान  घेतले  सारे  मुकुंदान
यावरती  उपाय  बाई  सांगे  ना  कोण
जीव  खाली  वरती  होतो  या अश्या भ्यान       
     त्याची  ओढ  लागे  माझ्या या अंतरी, 
         वेडी झाली राधा ऐकून बासरी...

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.

टिपूर  चांदण्याची  होती  मधाळी रात
पलंगावरती  पहुडले  होते  मी  निद्रेत
आता चोरुनी लपूनी आला तो आत
गपकरनी  कान्हान  धरीला  माझा  हात
    दचकले  स्वप्नात  मी  झाले  बावरी, 
          वेडी झाली राधा ऐकून बासरी...

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.

विसरता  विसरेना  त्याची  सावळी मूर्ती
आठवण  सारखी  छळते  मजला  एकांती
मन  मंदिरी  बसली  ज्याची  दिगंत  कीर्ती
त्याच्या  छायेने  नटली  ही  उत्तम  धरती
     छेडिते  मजला  सारी  गोकुळ  नगरी,   
          वेडी झाली राधा ऐकून बासरी...

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी.


       (साभार आणि सौजन्य-यू-ट्यूब -अमृतवाणी महानुभाव)
      ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.07.2021-शनिवार.