अंधश्रद्धा-गंभीर कविता - "देवाचिये द्वारी,उडी मृत्यूची अघोरी"

Started by Atul Kaviraje, August 02, 2021, 11:57:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     अंद्धश्रद्धेवर आणि एक प्रकाश टाकणारी कहाणी. बऱ्याच वर्षांपूर्वी, नक्की काळ मला आठवत नाही, पावन सिंहस्थ पुण्य पर्वावर, भक्त-गणांची पुण्य मिळवण्यासाठी अलोट, अमाप, प्रचंड गर्दी जमली होती. जो तो देवाचे दर्शन मिळविण्यासाठी अक्षरशः धडपडत होता. आणि त्याच वेळी त्या क्षेत्राची जागा अपुरी पडल्यामुळे, आणि संरक्षण व्यवस्था नीट नसल्यामुळे, प्रचंड गर्दी होऊन त्या गर्दीत बऱ्याच भक्तांना आपला जीव या चेंगरा-चेंगरीत गमवावा लागला होता.

     भक्त या क्षेत्री येतात, पुण्य मिळविण्या, दीर्घायुष्य मागण्या, आणि चक्क या देवाचिये द्वारी काळ प्रत्यक्ष त्यांच्यावर झडप घालतो आणि अकालीच त्यांना मृत्यू येतो . ऐकण्यास हे सर्व अजबच वाटत ना ! पण हे प्रत्यक्ष घडलं होतं. ऐकुया, ही मनाला व्यथित करणारी कविता. कवितेचे शीर्षक आहे- "देवाचिये द्वारी,उडी मृत्यूची अघोरी


                            अंधश्रद्धा-गंभीर कविता

     ( सिंहस्थ पर्वात चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांवर आधारित कविता )
                      "देवाचिये द्वारी,उडी मृत्यूची अघोरी"
   ----------------------------------------------------------- 
           

पारणे जन्माचे फिटेल आमुचे
येति भक्त,देवाचिये द्वारी
दैवगती पहा, कशी अटळ,
पडते तयांवरी उडी मृत्यूची अघोरी.

     येति भाविक पुण्यक्षेत्री,अपेक्षेने
     पुण्यप्राप्ती अन मोक्षाच्या इच्छेने
     परि आस तयांची अपूर्णच राही,
     दर्शन देवाचे मनीच पाही.

मज पुण्य हवे, मज पुण्य हवे
यातनांतून सुटण्या, शोधी क्षेत्र नवं-नवे
नकळे तयांस,कर्मातच देव आहे,
अन कर्मातच मोक्षही आहे.

     अंधश्रद्धेस जातात कित्येक बळी
     गर्दीत जातात त्याहूनही बळी
     हवा मोकळी होती जिथे कधी,
     श्वासही न-घेण्या जागा मिळावी थोडी ?

वाढत चाललीय संख्या भक्तांची
पुण्य-क्षेत्रे पडत चाललीय अधुरी
मरण समोर आ वासून राही,
देवाचिये द्वारी,उडी मृत्यूची अघोरी.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.08.2021-सोमवार.