प्रेम -मनोगत-प्रेम-काव्य- "सखी तुझं प्रेम जिंकलं "

Started by Atul Kaviraje, August 04, 2021, 11:31:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      एका  वेड्या  प्रियकराचे  हे  प्रेम - मनोगत  आहे.  आपली  प्रिया  आपल्या  मोहक  अदांमधून  , हाव -भावांतून  कशी  आपल्याला  रिझवण्याचा  प्रयत्न  करतेय , कसं  आपल्याला  जवळ  करण्याचा  अथक  यत्न  करतेय  हे  या  कवितेतून  प्रियकर  आपणास  सांगत  आहे . अखेर  तिचा  प्रयत्न  यशस्वी  होऊन  तिचा  प्रियकर  कसा  तिच्याकडे  सहज  ओढला  जातो  हेही  या  कवितेतून  आपणास  कळेल . ऐकुया   तर  या  प्रियकराच्याच  शब्दांतून  हे  उत्स्फूर्त  चिरंजीव  प्रेम-काव्य . कवितेचे  शीर्षक  आहे - "सखी  तुझं  प्रेम  जिंकलं "


                           प्रेम -मनोगत-प्रेम-काव्य
                         "सखी  तुझं  प्रेम  जिंकलं "
                        ------------------------


अशी एकटक पाहू नकोस
माझे मन मोहवू  नकोस
जादूभरी तुझी नजर प्रिये,
माझे हृदय चोरू नकोस.

माहिताहे मला हा तुझा साज
फक्त आहे माझ्यासाठी खास
डोळे तुझे काही सांगताहेत,
ओठ तुझे  काही बोलताहेत.

कितीही आवरले स्वतःस तरी
मन हे शेवटी मन असते
सौंदर्याचा पुजारी होऊन ते,
शेवटी तेथेच धाव घेते.

तुझ्या या अदेस अंती
मी पहा हार मानली
माझ्या हृदयाची तार छेडून,
तुझ्या प्रेमाची आज जीत झाली.



-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.08.2021-बुधवार.