म्हणी - "पी हळद हो गोरी"

Started by Atul Kaviraje, August 05, 2021, 12:15:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -  "पी हळद हो गोरी"

                                      म्हणी
                                   क्रमांक - 2
                               "पी हळद हो गोरी"
                             -------------------   

(२)  "पी हळद हो गोरी"
      -----------------

     (उतावळेपणा दाखविणे.
     एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळण्याची अपेक्षा करणे.
     हळद खाल्ल्याबरोबर शरीर गोरें होईंल अशी अपेक्षा करणें.
     कोणत्याहि कृतीचें फळ अगदीं ताबडतोब मिळावें अशी इच्छा असणें.)
   --------------------------------------------------------------

     आता थोडेसे हळदीचे गुणधर्मही पाहूया --------

     मराठीत एक म्हण आहे. "पी हळद अन हो गोरी". या म्हणीचा अर्थ काही वेगळा आहे. कोणत्याही उपायाचा परिणाम पटकन होत नसतो. हळद प्याल्यावर लगेच कोणी गोरी होत नसते असे या म्हणीतून सुचवायचे आहे पण प्रत्यक्षात मात्र हळद ही काही बाबतीत चटकन आणि बराच गुण देणारी आहे. असे काही प्रयोगातही दिसून आले आहे. काही लोकांनी हळद मिसळलेले पाणी दररोज सकाळी प्राशन करून त्याचे फायदे नांेंदवले आहेत तर काहींनी हळदीचा चहा किती गुणकारी असतो याचा अनुभव घेतला आहे. दररोज सकाळी साधारण ग्लासभर पाणी घ्यावे. ते गरम करावे आणि कोमट झाल्यावर त्यात अर्धा चमचा हळद मिसळावी. हे पाणी थंड झाल्यावर प्यावे त्याचे अनेक फायदे होतात.

     हळद ही जंतुनाशक असते. त्यामुळे ती अनेक रोगांचा सामना करण्यास उपयोगी पडते. काही वेळा ती काही रेडिएशन्सचाही प्रतिकार करण्यास फायदेशीर ठरली आहे. सध्या आपण मोबाईल फोेन फार वापरतो आणि त्याच्या रेडिएशन्सचा आपल्यावर काही परिणाम होण्याची शक्यता असते. आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हळद वापरायला मिळाली तर अशा परिणामांपासून आपण दूर राहू शकतो. हळद पाण्यात मिसळून प्यावी किंवा आहारात तिचा समावेश अवश्य होईल याची दक्षता घ्यावी. आपल्या समाजात दूध आणि हळद पिण्याची पद्धत आहे. त्यामुळे बसलेला घसा मोकळा होतो. घशाला कसला संसर्ग झाला असेल तर हळद आणि दूध गुणकारी ठरते. खोकला आल्यावर तर हळद आणि दूध घेतातच. ते घेतल्यावर दुसरे कसलेही औषध घेण्याची गरज नाही असे मानतात.

     काही लोक हळदीचा चहा तयार करतात. तो तयार करण्याची पद्धत आहे. कपभर पाण्यात चमचाभर हळद टाकून हे मिश्रण उकळा. नंतर त्याला खाली उतरवून त्यात थोडा मध टाका. त्याशिवाय त्यात थोडे लिंबू पिळा किंवा त्यात संत्र्याचा रस मिसळा. त्यामुळे या मिश्रणाला चांगली चव येईल. असा हा चहा प्याल्याने वजन कमी होेण्यास मदत होते. संधीवाताचा त्रास कमी होतो. शिवाय यात काही मिनरल्स रोगप्रतिकारक आणि कर्करोगास प्रतिबंध करणारे आहेत. जगाच्या काही भागात हळदीचा असा चहा फार लोकप्रिय आहे. कारण त्यामुळे मधुमेहाचा उपद्रव कमी होतो. हळद हे अगदी सहजगत्या उपलब्ध होणारे औषध आहे. त्याचा वापरही आपण करीत असतो पण त्याचे अनेक फायदे आपल्याला माहीतही नसतात.

      हळदीचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये होतो. हळदीमुळे जेवणाला तर चव येतेच पण आपल्या आरोग्यासाठी हळद फार गुणकारी आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा हळदीचे प्रमाण फार असते. हळदीच्या वापराने त्वचा नितळ मुलायम आणि सुंदर होते. आपल्याकडे नेहमीच म्हणतात 'पी हळद आणि हो गोरी'. जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण हळदीच्या वापरामुळे प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे.

१) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन असते. ते औषध म्हणून काम करते, शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.
२) तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते.
३) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.
४) अनेक रिसर्च नुसार हळद रोज खाल्याने पित्त वाढते त्यामुळे जेवण पचण्यात मदत होते.
५) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते.
६) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.
७) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो.
८) बायोकेमिस्‍ट्री आणि बायोफिजिकल रिसर्च नुसार हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप २ च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.
९) शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते. 


              (साभार आणि सौजन्य - माझापेपर .कॉम)
            --------------------------------------
             (साभार आणि सौजन्य  - महासराव .कॉम)
          ----------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.08.2021-गुरुवार.