अनोळखी व्हावं

Started by Deeksha, August 05, 2021, 01:45:26 PM

Previous topic - Next topic

Deeksha

वाटे पुन्हा त्या वळणावर जावं,एकमेकांसाठी पुन्हा अनोळखी व्हावं..

क्षण अपुरे ते सुटलेले,पुन्हा त्यांना  नव्याने जपावं..
तो शहारा अन ती ओढ वेडी सर्वकाही पुन्हा अनुभवावं...

खोट्या त्या रुसव्या फुगव्यांना  मनभरून पाहावं...
आणि गालीचं ते कोवळ चांदणं भरभरून ओसांडावं...

हळुवार उलगडलेल्या त्या गुंत्यामधे पुन्हा एकदा गुंतावं..
गुंतता तुझ्यात मग स्वतःलाच सामोरं मी जावं..

वाटे पुन्हा त्या वळणावर  जावं....
एकमेकांसाठी पुन्हा अनोळखी व्हावं.. ♥️
✍🏻@deeksha✍🏻
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Rohan Rajendra Bhosale

खूप छान कविता आहे. माझं यूट्यूब वर चॅनल आहे. "प्रेम काव्य" नावाने. त्यावर मी माझे आणि बरेच कवी आणि कवियित्री चे कविता व्हिडिओ मार्फत प्रदर्शित करतो त्यांच्या नावासहित. तुम्ही इच्छुक असाल तर मला ७७७७०९२२९७ ह्या नंबर वरती तुमची कविता पाठवू शकता.