कोरोना वास्तव चित्रण कविता - " WALK IN आत चालत या, BOOSTER DOSE जाताना घेऊन जा !

Started by Atul Kaviraje, August 05, 2021, 11:46:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     अजूनही कोरोनाचा  उद्रेक काही संपलेला नाही. तो अधिकाधिक वेगवेगळी रूपे धारण करीत चाललाय. त्यामुळे सर्व नागरिकांनी लस घेणे हे अपरिहार्यच आहे. पूर्वी लशींसाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. त्यापूर्वी, "कोविन - ऍप" वर नोंदणीकरण करणे जरुरीचे होते. खूपच त्रासदायक असे ते होते. लशींचा साठा संपला कि नवा साठा येईपर्यंत नागरिकांना थांबावे लागत होते. परंतु आता एक नवीन बातमी ऐकिवात आहे कि, "को-व्हॅक्सिन" आणि "कोव्ही-शिल्ड" या दोन्ही लशींचे भरपूर साठे उपलब्ध असून, आता लशींचे डोस घेण्यासाठी "कोवीन - ऍप"वर नोंदणीकरणाचीही गरज नाही.

     आता एक संकल्पना राबविण्यात येते आहे कि "वॉक इन" करा आणि डोस घेऊन जा. त्यामुळे आता लशींचे दोन्ही डोस घेणे नागरिकांना अगदी सुलभ, सहज शक्य झाले आहे. त्यात दुसरी बातमी अशी आली आहे कि, कॊरॊनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जरी दोन्ही डोस घेतले तर शरीरातील प्रतिकारात्मक शक्ती ही पूर्णपणे वाढत नाहीय, त्यासाठी अजून एक "बूस्टर डोस" घेणे आवश्यक आहे, असे   "WHO"  ( जागतिक आरोग्य संघटना ) यांचे मत आहे.

     ऐकुया तर, या वरील दोन्ही गोष्टींचा म्हणजे  " WALK-IN" आणि  "BOOSTER DOSE" ,चा अंतर्भाव असलेली साधी सरळ सोप्या शब्दांतील, चार शब्द, चार ओळी आणि बारा कडव्यांची, कोरोनाची वास्तव  चित्रण असलेली गंभीर, आणि लशीकरणावरील वैचारिक कविता . कवितेचे शीर्षक आहे-  " WALK IN आत चालत या,BOOSTER DOSE जाताना घेऊन जा !"


                      कोरोना लसीकरणाचे वास्तव चित्रण कविता
     " WALK IN आत चालत या, BOOSTER DOSE जाताना घेऊन जा !"
     ---------------------------------------------------------------


कोरोनाचा उपद्रव वाढतच चाललाय
त्याचा अक्राळ-विक्राळ भस्मासुर झालाय
ग्रासतोय सर्वांस, गिळतोय माणसांस,
आकांत माजवून, वेढतोय जगतास.

सुरक्षा उपायच एक रामबाण
लशीच करतील तयाचे शिरकाण
कितीही रुपांतरे होवोत कोरोनाची,
रूपेही बदलतील अनेक, लशींची.

पुरवठा होत होता नाम-मात्र
कोरोनाचे वर्चस्वच होते सर्वत्र
"१३५ कोटी" संख्या भारताची,
उकल होत नव्हती प्रश्नांची.

"को-व्हॅक्सिन, कोव्ही-शिल्ड" आली धावुनिया
जणू वरद-दायी देव अन देविया
उत्तरे सापडत चाललीत प्रश्नांची,
टोचणी सुरु झालीय लशींची.

"COVIN-APP" नव्याने "INTRODUCE" झाले
सर्वानी "VAXINATION"-ला नाव नोंदविले
पण मर्यादित लशींची संख्या,
त्यापुढे अफाट ही जन-संख्या.

रांगा लावून लोक थकले
लशींचे साठे संपुष्टात आले
मुदत-वाढ लशींची होत राहिली,
जनता वाट पाहून कंटाळली.

पण आज चित्र बदलले
लशींचे मुबलक "STOCK" गवसले
"CO-VAXIN, COVI-SHIELD" नकोय नोंदणी,
"WALK-IN" या तुम्ही लशी-करणी.

जनता सुखावली, आनंदी झाली
"COVIN-APP" ची कटकट संपली
"WALK-IN" ने काम केले सोपे,
सहज डोस मिळू लागले.

पण कोरोना कसला चतुर
रूप बदलण्यास झाला आतुर
दोन्ही डोस कमी पडले,
प्रतिकार-शक्तीचे घट रिकामी झाले.

"WHO" ने निष्कर्ष काढला अंती
अधिक डोस भरेल  क्षिती
"BOOSTER DOSE" ची मागणी वाढली,
रांग पुन्हा वाढू लागली.

असे कोठवर चालणार यापुढे ?
डोस घेतच राहायचे महिनोनमहिने ?
एका जालीम परिणामकारक लसीची,
आवश्यकता भासतेय आज कळकळीने.

तोवर त्रिसूत्री पाळत राहायची
"MASK", "SANITAZATION" अन "SOCIAL DISTANCE"
तो टप्पा गाठायचाय आपल्याला,
सुरक्षित करायचेय आपलेच जीवन. 



-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.08.2021-गुरुवार.