बंध

Started by Aniket sagar, August 06, 2021, 12:55:57 PM

Previous topic - Next topic

Aniket sagar

बंध

कसा आवरू लागला
मोह तिचा या मनाला
दिस रात तिच दिसे
काय सांगावे कुणाला...

स्पर्श वाटे गं हवासा
हाती घेता तुझा हात
होई काळजात माझ्या
पिरमाची बरसात...

लिहिलेल्या गझलांना
आला प्रेमाचा सुगंध
जेव्हा मिळाला मिळाला
प्रिती या नावाचा बंध...

नको दुरावा दुरावा
नको निरव शांतता
सप्त स्वर ओठी यावे
माझ्यासवे तू बोलता...

नाते तुझे अन् माझे
सात जन्मांचे जुळले
नाही विरह वेदना
प्रेम हृदयी वसले...

©® अनिकेत मशिदकर
             -सागर