गायत्री मंत्र - "ॐ भूर्भुवः स्वः"

Started by Atul Kaviraje, August 06, 2021, 10:50:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II श्री गायत्री देवी नमः II
                             ----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज शुक्रवार. देवीचा वार. आज ऐकुया गायत्री मंत्र आणि या मंत्राची महती. या मंत्राचे बोल असे आहेत- "ॐ भूर्भुवः स्वः"


                                गायत्री मंत्र
                             "ॐ भूर्भुवः स्वः"
                            ----------------   
       

     गायत्री मंत्र - विश्वाची मूळ माता गायत्री हिचा हा मंत्र आहे.दत्तगुरुंनी इच्छा गायत्री (आत्मरुपी चित्कला) आणि सविता (आत्मरुपी प्रकाश) यांच्या माध्यमातून विश्वाचा पहिला स्पंद प्रसवला तो म्हणजे ॐ कार / परमात्मा. त्यानेच त्याच्या मातेचा हा मंत्र प्रथम जपला. नंतर कलियुगात श्रद्धावानांच्या रक्षणासाठी विश्वामित्रांनी तपश्चर्या करुन तो सिद्ध करुन मुक्त केला. हा ध्वनी प्रगटण्या आधी जो प्रकाश पसरला तो म्हणजे आदिगुरू दत्तात्रेय (जसे, वीज चमकतात , नंतर काही वेळाने ध्वनी ऐकू येतो). म्हणून दत्तात्रेय हे परमात्म्याचे वडिलबंधू.

     गायत्री हे आदिमाता चण्डिकेचे तरल रुप. हीच जेव्हा सुक्ष्म रुप धारण करते तेव्हा ती महिषासुरमर्दिनी म्हणून येते (कारणानुसार आकार घेणारे तेज) व तिच्या सोबत परमात्मा येतो तिचा देवीसिंह, वाहन बनून. हीच जेव्हा स्थूल रुप धारण करते तेव्हा अनसुयामाता बनून येते व तिच्या सोबत परमात्मा येतो तो तिचा छोटा भाऊ कपिलाचार्य बनून आणि दत्तात्रेय येतात ते तिच्या पुत्राचा देह धारण करुन.


ॐ भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात्॥

     हा मंत्र त्रिपदा गायत्री रुपातही जपता येतो (त्रिपदा म्हणजे तीन ठिकाणी ॐकार असतो)

II ॐ भूर्भुवः स्वः
ॐ तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात् ॐ॥


              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली .कॉम)
             -----------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.08.2021-शुक्रवार.