गंभीर कविता-"पुण्याचे पुण्य लागले सरू, मद्यधुंद तरुणी लागली रस्त्यावर पसरू."

Started by Atul Kaviraje, August 06, 2021, 11:40:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     दोन दिवसांपूर्वीच यु-ट्यूब वर एक बातमी व्हायरल झाली होती की, एक तरुणी, मद्य पिऊन रस्त्यावर चक्क लोळण घेत आहे. तिला दारू इतकी चढली होती, की स्वतःलाही तिला कळत नव्हते की ती काय करतेय? रस्त्यावर बसत काय होती, झोपत काय होती, लोळत काय होती, आजूबाजूंच्या वाहनांना थांबवत काय होती, त्यांच्याकडे लिफ्ट काय मागत होती. या तरुणीने त्या दिवशी अगदी धुड्गुसच घातला होता. 

     विद्येचे माहेरघर, पुण्य नगरीला हे दृश्य अगदी नवे होते, कारण असे कधीच घडले नव्हते. तर सांगायचं मुद्दा हा की, कुठे वहात चाललीय आजची तरुणाई, विशेषतः या तरुणी, तरुण मुली ? यांचेवर घरच्यांची दहशत नाहीय का? त्यांना  घरून धाकात ठेवले जात नाहीय का ? वेळीच त्यांचे समुपदेशन केले गेले नाही, तर उद्या अश्या अनेक तरुणी मद्य-धुंद अवस्थेत रस्त्यावर सापडतील यात नवल ते काय ?


     ऐकुया तर या  आजच्या पिढीवर, गंभीर विषयावर, एक कविता. कवितेचे शीर्षक आहे- "पुण्याचे पुण्य लागले सरू, मद्यधुंद तरुणी लागली रस्त्यावर पसरू."



                      आजच्या पिढीवर, गंभीर कविता
                 विषय : पुण्याच्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणी
      "पुण्याचे पुण्य लागले सरू, मद्यधुंद तरुणी लागली रस्त्यावर पसरू."
     -----------------------------------------------------------


विद्येचे माहेरघर म्हणजे पुणे
मराठी माणसाचे बाणेदार पुणे
पुणे तिथे काय उणे ?
असे कोठेही नाही होणे !

नाव होते पुण्याचे एकेकाळी
साहित्यिक,कवींची होती मायंदाळी
मराठी भाषा बोलत होती,
वाजत होती तुकारामांची चिपळी.

आज तेथे घडतेय अघटित
लोक झालेत पाहून अचंबित
पुतळे उभारलेत विचारवंत व्यक्तींचे,
तेही पाहताहेत होऊन स्तंभित.

गजबजलेल्या रस्त्यावर नवयुवा तरुणी
पिऊन मस्त होती, वारुणी
इतकी की, नव्हते भान,
गळाले होते सारेच अवसान.

किंकर्तव्य-विमूढ होती पहात जनता
षोडषा युवतीचे थेर चाळे
कारणीभूत हे मद्यच तयाला,
विचार-क्षमता,बुद्धी,शक्तीच गळे.

खुणावत होती,बोलावीत होती
उठत होती, बसत होती
झोपत होती, लोळत होती,
रस्त्याची ती राणी होती.

पुरुष आजवर लोळले गटारात
बुडून धुंद मद्याच्या कैफात
स्त्रियांचे आज युग आलंय,
पुरुषांना तुल्यबळच त्या ठरतात.

म्हणून का इतके वाहावे ?
काय करतेय भानच नूरावे ?
ती पण पुणेकर युवती ?
धाब्यांवर बसवून नियमांची पोथी !

कुठे भरकटतेय युवा पिढी ?
तरुणीही लागल्यात ओढू विडी
संस्कार नाहीत नीट मिळत
सोपस्कारच गेलेत पीठ दळत !

आज एक, उद्या दुसरी
तरुणींचा जथ्थाच रस्त्यावर सापडेल
दारू पिणे हानिकारक आहे ?
बाटलीतच त्यांचे जीवन अडकेल ?

पाश्चिमात्यकरण आहे याला जबाबदार
संस्कृतीची झालीत सारी लक्तरे
वहात जाऊन आजची तरुणाई,
डोळ्यांपुढे दिसताहेत उद्याचे खतरे

समुपदेशनाचा एकच मार्ग योग्य
बिघडणाऱ्या तरुणाईला आणेल मार्गावर
रस्त्यावर वाहनेच दिसतात बरी,
नकोय लोळणारी मद्यधुंद नारी.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.08.2021-शुक्रवार.