पिझ्झा डिलिव्हरी बॉईज यांचे मनोगत - चारोळ्या-" आम्ही पिझ्झा डिलिव्हरी बॉईज "

Started by Atul Kaviraje, August 07, 2021, 02:20:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

          पिझ्झा डिलिव्हरी बॉईज यांचे मनोगत - चारोळ्या
           " आम्ही पिझ्झा डिलिव्हरी बॉईज "-(भाग-१)
        -------------------------------------------


१)  बसून नोकरीत नाही दम
     फिरून डिलिव्हरी आम्हा आवडते
     पिझ्झा डिलिव्हरी बॉईज आम्ही,
     सगळीकडेच आमची प्रतीक्षा होते.

२)  नवं-रंगांचे, नवं-ढंगांचे
     विभिन्न आकारांचे, भिन्न-भिन्न चवींचे
     आधुनिक प्रकारांच्या चपात्या-भाकऱ्या पुरवितो,
     पिझ्झा ऐसे नाम त्याचे.

३)  फास्ट फूडचे आजचे खाणे
     तसेच जगणे, असेच राहणे
     सर्वांना पाहिजे सतत आराम,
     पिझ्झा करतोय त्यांचे काम.

४)  ठराविक पोशाख, नेमलेली दुचाकी
     फोन येताच निघते पालखी
     गरमा-गरम पिझ्झाचा आस्वाद घेण्या,
     नकोत कोण्या मोठ्यांच्या ओळखी.

५)  श्रीमंत असो, गरीब असो
     साऱ्यांच्या जिभेवर रेंगाळणारी चव
     चोचले आम्ही त्यांचे पुरवितो,
     पिझ्झाचा बॉक्स घरोघरी पोचवितो.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.08.2021-शनिवार.