प्रेरणादायी कविता- "गोल्डन बॉयची सुवर्णमय कामगिरी, टोकियो भाला -फेकीत अव्वल ठरी

Started by Atul Kaviraje, August 08, 2021, 02:01:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 मित्र/मैत्रिणींनो,

     यंदाच्या म्हणजे "२०२१-च्या ऑलिम्पिक" मध्ये भारताचा "गोल्डन बॉय नीरज चोप्रा" याने दोन दिवसांपूर्वीच  "भाला-फेक" या खेळ-गटात, "सुवर्ण पदक" पटकावले. हरयाणा राज्यातील, पानिपत शहरातील एक छोटेसे खेडेगाव खान्द्रा येथे शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला भाला-फेकीची आवड होती. प्रोत्साहन मिळून, बऱ्याच लहान-मोठ्या स्पर्धांतून भाग घेऊन , त्याने स्वतःच्या मेहनतीवर, कष्टांवर आणि अथक प्रयत्नाने  बरीच पदके मिळवली होती.   

     राज्यस्तरीय, अंतर-राष्ट्रीय पातळीवर त्याने सुवर्ण आणि रजत पदके प्राप्त केली होती. आता या ऑलिम्पिकमध्ये  त्याने स्व-कौशल्यावर, जिद्दीने, एक - लक्ष्य ठेवून सुवर्ण-पदाचे लक्ष्य पूर्ण केले , व अवघ्या २३ वर्षांत याचा तो भारतातील यंदाचा एकमेव मानकरी ठरला. आपल्या गावाची आणि पर्यायाने देशाचीही मान त्याने उंचावली, व आपल्या आई-वडिलांचे नावही सार्थ  केले. त्याच्या या अतुल-नीय  कामगिरीसाठी, माझा त्याला हृद्य सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी, मनापासून शुभेच्छा.

     ऐकुया तर, त्याने आपल्या चिकाटीवर, जिद्दीवर, कष्टांवर मिळविलेल्या या सुवर्ण पदकाची व पर्यायाने  या गोल्डन बॉयची प्रेरणादायी कवितारूपी कहाणी. या कवितेचे शीर्षक आहे- "गोल्डन बॉयची सुवर्णमय कामगिरी, टोकियो भाला -फेकीत अव्वल ठरी "



    विषय: भारताच्या गोल्डन बॉय ने टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकले
                                    प्रेरणादायी कविता

       "गोल्डन बॉयची सुवर्णमय कामगिरी, टोकियो भाला -फेकीत अव्वल ठरी "
                               सुवर्ण-पदकाचा मानकरी-नीरज चोप्रा
     -------------------------------------------------------------------


चार वर्षांनी स्पर्धा भरतात
जागतिक पातळीवर चुरशी होतात
"ऑलिम्पिक" खेळात सहभागी होणारे,
युद्ध-पातळीवरच खेळी करतात.

नाव करायचे असते जगभर
मेहनत त्यासाठी होते आयुष्यभर
प्रत्येक देश झटत असतो,
खेळाडू तयार होत असतो.

"२०२१"-ची ऑलिम्पिक भरलीय "टोकियोत"
मान्यवर देश झालेत सहभागी
झेंडा फडकविण्या उत्सुक सारे,
उत्साहाचेच पसरलेत सर्वत्र वारे.

सुवर्ण,रजत, कांस्य पदकासाठी
होते खेळ-लढत चुरशीने, परोपरीने
जणू युद्धातच उतरती खेळाडू,
पदक जिंकण्याच्या तयारीतच, कसोशीने.

असाच एक खेळ-गट, "भाला-फेकीचा"
खेळ, संयमाचा अन ताकदीचा
ज्याचा जाईल भाला दूरवर,
तोच मान पटकावितो पदकाचा.

आज होता "सुवर्ण-दिन" भारताचा
भारत सुपुत्र "गोल्डन बॉयचा"
२३ वर्षीय  "नीरज चोप्राचा",
कस लागला आजवरच्या कष्टांचा.

केंद्रित झाले सारे लक्ष
दिसत होते दूरचे लक्ष्य
भाल्यावरची पकड घट्ट होती,
लांबची सीमा नजरेत होती.

एकच निग्रह, भाला-फेक झाला
सारे कसब पणास लागले
मर्यादा साऱ्या ओलांडून भाल्याने,
आपले टोक पल्याड रुतवले.

एक जल्लोष, एकच हुर्ये
नीरजचे कष्ट फळास आले
सर्वांपुढे जाऊन त्याने आज,
ऑलिम्पिकचे "सुवर्ण पदक" जिंकले.

"मोगली"ने मनात स्थान मिळवले
"भारता"चें नाव जगात केले
"गोल्डन" असलेल्या आमच्या "बॉय"ने,
"गोल्ड"चे "मेडल" गळ्यात घातले.

अथक परिश्रम, कष्ट, जिद्दीने
जिंकण्यासाठीच तो खेळत होता
अदम्य इच्छा मनात धरूनच,
ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला होता.

सलाम तुला "नीरज चोप्रा"
अशक्य ते शक्य केलेस
पुढील प्रवासास तुला शुभेच्छा,
आई वडिलांचे पांग फेडलेस.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.08.2021-रविवार.