‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "झरे मेघ आभाळी तेव्हा"

Started by Atul Kaviraje, August 10, 2021, 01:08:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे दुसरे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " गुरू ठाकूर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -" झरे मेघ आभाळी तेव्हा"


                              कविता पुष्प-दुसरे
                           "झरे मेघ आभाळी तेव्हा"
                        -------------------------


झरे मेघ आभाळी तेव्हा
     ठायीठायीचे हिरवे यौवन, गात्रांमध्ये भरून घ्यावे......
     ठायीठायीचे हिरवे यौवन, गात्रांमध्ये भरून घ्यावे......


     'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज पाहू या गुरू ठाकूर यांची कविता...


झरे मेघ आभाळी तेव्हा
भान हरपुनी चिंब भिजावे
थेंबांचे इवलाले मोती,
तळहातावर झेलून घ्यावे.

झरे मेघ आभाळी तेव्हा
मातीच्या गंधात भिनावे
धरून बोट वाऱ्याचे अलगद,
डोंगरमाथे चुंबुनी यावे.

झरे मेघ आभाळी तेव्हा
पाऊसवेडा पक्षी व्हावे
क्षितिजावरल्या इंद्रधनुच्या,
रंगामध्ये रंगून जावे.

झरे मेघ आभाळी तेव्हा
हळूच हिरव्या रानी जावे
ठायीठायीचे हिरवे यौवन,
गात्रांमध्ये भरून घ्यावे.

आणि यातलं काहीच जमत नसेल तर...?

झरे मेघ आभाळी तेव्हा
क्षणभर अपुले वय विसरावे
नाव कागदी घेऊन हाती,
खुशाल डबक्याकाठी रमावे.


                  -- कवी -"गुरू ठाकूर"
                   ---------------------

    (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                     'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
  --------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.08.2021-मंगळवार.