नरम - गरम खुशखुशीत मुका-विरोधी चारोळ्या - NO KISSING ZONE

Started by Atul Kaviraje, August 11, 2021, 01:53:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        विषय : NO KISSING ZONE
                   नरम - गरम खुशखुशीत मुका-विरोधी चारोळ्या
  " सर्व  ZONE NO-KISSING झालीत, प्रेमी-जीवांच्या जीवाची घालमेल चाललीय "
                                    (भाग-१)
------------------------------------------------------------------------


(1)
"NO PARKING ZONE" पर्यंत ठीक आहे
"NO HONKING","NO HAWKERS" पण माहित आहे
पण हे "NO KISSING ZONE" ?
यात नक्कीच काहीतरी "MISSING" आहे !

(२)
तेव्हा,
     हे क्षेत्र सर्वांना "निषिद्ध" आहे
     जाहीर फलक झळकत होते, रस्त्यारस्त्यांवर
     ऊत आला होता, कुणीही पाहात नव्हते,
     "मूक" (मुका ?) प्रणय सुरु होता,प्रेमिकांचा प्रत्येक बाकाबाकांवर.
आता,
     हे क्षेत्र "मुके" घेण्यास बंद आहे
     जाहीर फलक तळपत होते रस्त्यारस्त्यांवर
     रस्त्यावर कुणीच नव्हते,सारा रस्ता झाला होता उजाड,
     "मुका"च झाला होता "मुका" प्रेमी-जनांचा, बाके सारी पडली होती ओसाड.

(३)
प्रेमी युगुलांची चांगलीच उडाली होती भंबेरी
जेव्हापासून "NO KISSING ZONE" जाहीर झाले होते
दुधाची तहान ताकावर पण भागत नव्हती आज,
दोन ध्रुवांवर दोघे आपणच, प्रचित होत होते.

(४)
मुले खेळू-बागडू लागलीत,बायका सहज फिरू लागल्यात
वृद्ध "EVENING WALK" घेण्यास तयारीत आहेत
आता संकोच नाही, सारे कसे मोकळे वाटतेय,
जेव्हापासून "गुटर्गु पंछी" पिंजऱ्यात अडकलेत.

(५)
बिघडलेली संस्कृती आज पुन्हा सावरू लागलीय
वाया गेलेली मुले-मुली, छान सुधारू लागलीत
'NO KISSING ZONE" चा कायदा आल्यापासून,
ती नीट वागण्याचा वायदा करू लागलीत.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2021-बुधवार.