रोज..

Started by anolakhi, March 21, 2010, 12:56:56 PM

Previous topic - Next topic

anolakhi

रोज सूर्य का मावळतो ?
रोज संध्याकाळ का होते ?
रोज मनी काळोख का दाटतो ?
का मला रोज तू आठवतेस.....?

का रोज मी तुझ्यात हरवतो ?
रोज मी परत तुझ्यातच का सापडतो ?
रोज रात्र तुझ्या सोबत का जागवतो ?
रोज पहाटे तला शोधात दिशा का चाचपडतो ?
रोज देवाकडे तुला का मागतो ?
रोज देव माझे सर्व काही एकूण घेतो ?
आणि तरीही का ऐकूनही मग न ऐकल्यासारखा वागतो ?

रोज दिवसभर भान हरपून मी वावरतो ?
रोज पुन्हा मी का सावरतो ?
मग रोज मी स्वतहाचीच समजूत का काढतो ?
आणि जेव्हा असे वाटते मनाला सारे पटले,
तेव्हा मग,
.
.
रोज सूर्य मावळतोच ,
रोज संध्याकाळ होतेच,
आणि मग मला तू आठवतेस.....रोज....

(अनोळखी)    निलेश...

santoshi.world

छान आहे! आवडली :) .........

पण कवितेखाली नाव नाही दिलंस तुझं... लोकांना कसं कळणार ही तुझी कविता आहे की just copy paste ;) ......

आणि "रोज पहाटे तला शोधात दिशा का चाचपडतो?" या कडव्यात नक्की काय म्हणायचे आहे ते कळत नाही "तुला शोधत" की "तुझ्या शोधात"?
तसेच "रोज इवसाभर भान हरपून मी वावरतो?" ह्यात "इवसाभर" म्हणजे नक्की काय? मी पहिल्यांदाच ऐकतेय हा शब्द म्हणून विचारतेय ............. "दिवसभर" असे आहे का ते? ........
"स्वतहाचीच" च्या ऐवजी "स्वत:चीच" हा शब्द वापर ............

बाकी मस्त जमली आहे कविता ....... कालच तुझ्या २-३ कविता वाचण्यात आल्या होत्या ......... मस्त होत्या त्याही ........ आणि हा जमलं तर अनोळखी ऐवजी तुझे स्वत:चे खरे नाव दे ....  :)

anolakhi

आपल्या मोल्यवान सल्ल्या साठी धन्यवाद ......

gaurig

chanach jamali aahe kavita.......keep it up...... :)