म्हणी - "उंटावरचा शहाणा"

Started by Atul Kaviraje, August 12, 2021, 12:59:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


मित्र/मैत्रिणींनो,

     'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -  "उंटावरचा शहाणा"


                                     म्हणी
                                  क्रमांक - 9
                              "उंटावरचा शहाणा"
                            ---------------------


9)   उंटावरचा शहाणा
    ------------------

    --मूर्ख सल्ला देणारा.
    --मूर्खपणाचा सल्ला देणारा.

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
           ----------------------------------------------

                      कथा क्रमांक - १:-----
                   ----------------- 

     एकदा एका पारड्याची मान रांजणात अडकून बसली. ती बाहेर निघेना. घरचा यजमान बाहेर गेला होता. तेव्हा रस्त्यावर उंटावर बसून एक माणूस चालला होता त्याला उपाय विचारला. त्याने प्रथम उंटासकट आंत येण्यास घराचा दरवाजा पाडावयास लावला
मग पारड्याची मान तोडण्यास सांगितले. नंतर डोके रांजणात अडकले म्हणून शेवटी रांजण फोडण्याचा सल्ला दिला !

             -- महामूर्ख , भलतीच मसलत देणारा माणूस.


                        कथा क्रमांक - 2:-----
                       -----------------

     एका शेतकर्याची म्हैस पाण्याच्या रांजणात तोंड घालते व ते तिला बाहेर काढता येत नाही ! त्याला काही सुचत नाही. तो इकडे तिकडे बघतो. त्याला एक उंटावर चाललेला माणूस दिसतो. समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याला पाचारण करतात. घराला असते भिंतीचे कुंपण ! माणूस म्हणतो, मी उंटावरून खाली उतरतच नाही. सल्ला हवा असेल तर भिंत पाडा, नाहीतर मी चाललो परत. भिंत पाडून वाट केली जाते. तोवर बाकीची लोक जमा होतात..अशी अट घालतो म्हणजे हा नक्कीच  खूप शहाणा असणार... सगळे कुजबुजत असतात.नंतर हा माणूस सल्ला देतो, मानच अडकली आहेत ना.  यात काय विषेश आहे, आधी म्हशीची मान कापा ! मान कापतात पण ती तर रांजणात अडकून पडलेली ! आता काय करायचे ? माणूस सांगतो, अरे आता सोपे आहे, आता मडके फोडा ! मान निघेल बाहेर.. माझे काम झाले, मी चाललो !

😂😂😂😂
तात्पर्य : चुकी त्या माणसाची नाही.. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या वेड्यांची आहे.
😎😉


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2021-गुरुवार.