चारोळया-"नागाच्या पिल्लानी घर भरलंय, सर्प-मित्रांच्या डोळ्यांचे पारणे फिटलंय"

Started by Atul Kaviraje, August 12, 2021, 02:04:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     विषय : घरात सापडली नागाची पिल्ले
                   खुमासदार मार्मिक गंभीर विनोदी चारोळया
     "नागाच्या पिल्लानी घर भरलंय, सर्प-मित्रांच्या डोळ्यांचे पारणे फिटलंय"
                                 (भाग-१)
   -----------------------------------------------------------------


(१)
आश्रय घेताहेत नागांची पिल्ले घरा-घरांतून
वाचली होती जी बिचारी या महापुरातून
त्यांनाही जगण्याचा हक्क आहे,आम्हा मानवांसारखा ,
जंगलही नाहीय सुरक्षित,बिळांनाही बसलाय पाण्याचा विळखा.

(२)
आता नाग आणि नागीण येथेच मुक्काम घेतात
माणसांसोबत ती जणू मित्रत्त्वानेच रहातात
विणीचा हंगाम येताच, अगदी बिनधास्तपणे बेडरूममध्ये,
पन्नास-साठ, छोट्या सुरेख पिल्लाना जन्मही देतात.

(३)
आता भय नाही राहिलंय, केव्हाच पळून गेलंय
सर्प-मित्र खात्यात मी माझे नोंदणीकरण केलंय
घरा-घरांतून सर्प-नाग निघण्याची वर्दी मिळताच,
प्रत्येक घरातून मला न चुकता पाचारण केलं गेलंय.

(४)
आता नाग-पंचमीला चित्र काढावे लागत नाही नागाचे
मुक्कामाला माझ्या घरी प्रत्यक्ष नाग-देवताच आहेत
सोबत वीस-तीस पिल्लांचा संसार सांभाळीत,
नागीणही पूजा करून घेण्यास सज्ज आहे.

(५)
जंगल-तोड झाली, वणवा पसरला वनो-वनी
सर्पांच्या-नागांच्या तोंडाचे पाणी पळून गेले
सारी सारी सर्प जमात आज नाईलाजाने,
मनुष्य-वस्तीस मुक्कामी, खोल्यांत राहू लागले.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2021-गुरुवार.