म्हणी- "आयजीच्या जीवावर बायजी उदार"

Started by Atul Kaviraje, August 13, 2021, 12:37:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आयजीच्या जीवावर बायजी उदार"

                                   म्हणी
                              क्रमांक - 10
                   "आयजीच्या जीवावर बायजी उदार"
                  --------------------------------


10)  आयजीच्या जीवावर बायजी उदार
      -------------------------------

-- दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
-- एखाद्या व्यक्तीने मिळवलेली विद्वत्ता /संपत्ती / मिळकतीवर दुसऱ्याच व्यक्तीने त्या इतरांना वाटून त्याबद्दलचा मोबदला / श्रेय मिळवले तर ! एकाच्या मेहनतीवर दुसरा व्यक्ती मजा मारत असेल अशी परिस्थिती निर्माण होणे .
-- दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे.
-- दुसर्‍याच्या जिवावर चैन करणें मोठेपणा मिरविणें.
-- दुसर्‍याची वस्तु अगर धनदौलत सढळ हातानें खर्च करणें. किंवा मोठ्या दानशूराचा आव आणून देऊन टाकणें.


                (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
              --------------------------------------------


                         उदाहरण:-----
                        ----------

     आयजी ज्या जिवावर बायजी उदार.  कौलेज  मध्ये शिकत असतांना मी व्यवसाय देखील करायचो, त्यामुळे माझ्या जवळ कायम पैसे असायचे. दर रविवारी आम्ही मित्र जेवायला बाहेर जात असू व बील मीच देत असे. मी बीलातील सुट्टे पैश्यातील ५/१० रुपये वेटरला टिप देत असे.

     एका रविवारी माझी तब्येत बरी नसल्याने माझ्या घरातच उपहारगृहातून जेवण आणायचे ठरले. माझ्या एका मित्राला जेवण आणायला पैसे दिले. परत आल्यावर त्याने मला बील दाखविले व म्हणाला वीस उरले होते, तू टिप देतोस म्हणून मी पण टिप दिली. झालाका आयजीच्या जीवावर बाईजी उदार !


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2021-शुक्रवार.