वास्तव-वादी,मार्मिक चारोळ्या-"MOBILE-चा DATA HACK होतोय,CYBER CRIME वाढत जातोय "

Started by Atul Kaviraje, August 13, 2021, 01:46:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

               विषय : मोबाईलमधील व्हायरसने सर्व डेटा संपवला
                      गंभीर वास्तव-वादी ,मार्मिक चारोळ्या
  "MOBILE-चा DATA HACK होतोय,CYBER CRIME वाढत जातोय "
                                 (भाग-१)
  ---------------------------------------------------------------


(१)
"MOBILE" लवकर घेण्याची चूक मी केलीय
"CYBER" गुन्हेगारी हातपाय पसरू लागलीय
केव्हा गजाआड होतील, वाट पाहतोय ?
बाजारात "HACK-PROOF" "MOBILE"-ची आधुनिक "TECHNOLOGY" आलीय !         

(२)
"DIGITAL INSTRUMENTS"-चा फायदा, तसा तोटाही !
विक्री करणाऱ्यास नाही होत कधी घाटाही !   
खरेदी करणारा मात्र नेहमीच पस्तावतो,
जेव्हा त्यांचा गुप्त "DATA" चोरला जातो.

(३)
"CYBER CRIME" वरचढ ठरतंय क्षेत्रात
पोलिसांनाही सापडत नाहीय मागोवा त्यांचा
अंधाऱ्या खोलीत डोई झाकून गुन्हेगारांची,
वेध घेतात बोटे,समोरील प्रकाशमान गणक-यंत्राचा.

(४)
'NETWORK" साऱ्या जगभर पसरलय "CYBER CRIME"वाल्यांच
बडे मासे,छोटे मासे अलगद सापडती जाळयात
तल्लख बुद्धिमत्तेचा वापर करीत गुन्हेगार,
सहजी "HACK" करिती सरकारचेही गुप्त भांडार.

(५)
माझ्या "MOBILE" वर एकदा आला "MESSEGE"   
सावधान ! आम्ही तुम्हाला पहात आहोत
खाजगी "DATA HACK" होतोय सहजा-सहजी,
पण "तिसरा डोळा" सापडत नाहीय आजही !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2021-शुक्रवार.