विनोदी चारोळ्या - " लशी टोचल्या, चुंबकत्त्व आले "-(भाग-२)

Started by Atul Kaviraje, August 14, 2021, 03:04:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     काही दिवसांपूर्वी  वाचनात एक बातमी आली होती की, महाराष्ट्रात एका सद्गृहस्थाने, कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतल्यावर, त्यांच्या अंगी चुंबकत्त्व येऊन काटे, चमचे, किचन मधील इतर धातूच्या वस्तू त्यांचा बाह्य-शरीरावर सहज चिकटू लागल्या होत्या. सत्य पडताळून पाहण्यास अनिसने त्यांच्या घरी वर्णी लावून मुलाखतही घेतली होती.

     पण मला वाटत, यात अंधश्रद्देचा प्रश्नच उद्भवत नाही, हे निखालस शास्त्रच आहे, निमित्त एवढंच, की कोरोनाचे दोन्ही व्हॅक्सिन डोस घेतल्यावर, त्यांच्या शरीरात आधीच लपलेले हा चुंबकत्त्वाचा सुप्त गुण, उफाळून वर आला इतकंच.  असो, काही खुमासदार चारोळ्या या विषयावर मला सुचल्या आहेत.


                            विनोदी चारोळ्या
                   " लशी टोचल्या, चुंबकत्त्व आले "
                               (भाग-२)
                  -----------------------------


६)  आम्ही हॉटेलात जायचो आधी कधी- कधी
      आता आमचे जाणे सर्रास वाढलेय
      शेजाऱ्याना आजही प्रश्न पडतोय अधी - मधी,
      आमचे घर धातूंच्या भांड्यानी कसं भरलेय ?

७)   नोकरी सोडली, आता गरज नाही
      बक्कळ पैसा मिळतोय, या चुंबकत्त्वातून
      पेन्शनही मिळतेय, उर्वरित जीवनासाठी,
      इस्टेट  एजन्सीही  उघडलीय  बंगला  बांधण्यासाठी .

८)  आज  कोरोनाचे आभार मानण्या
     मी त्याचे घरभर फोटो लावलेत
     त्याच्यामुळेच तर हे झाले शक्य ,
     नाहीतर होते हे सारेच अशक्य.

९)  लोकांमध्येही मी करतोय जन-जागृती
     लशी टोचण्यासाठी, बाणवतोय अंगी प्रवृत्ती
     त्यांचाही होण्या मॅग्नेट-मॅन लवकरच,
     माझ्या क्लास मध्ये शिरकाव होण्या अन मिळण्या ख्याती.

१०)  चुंबकत्त्व वारसा-हक्काने कुटुंबातही उतरलंय
      कुटुंबही उतरलंय या क्षेत्रात 
      मेटल - पॉट्स अंगी चिकटवून,
      सर्वांचे आलेत गोल्डन - डेज.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2021-शनिवार.