म्हणी - "नाचता येईना अंगण वाकडे "

Started by Atul Kaviraje, August 14, 2021, 02:41:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "नाचता येईना अंगण वाकडे "

                                     म्हणी
                                क्रमांक - 11
                         "नाचता येईना अंगण वाकडे "
                        ----------------------------


11)  नाचता येईना अंगण वाकडे
     --------------------------

--स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो.
--जर कोणाला एखादी गोष्ट जमत नसेल तर उगाच कारणं देणे.
--स्वतः येत नसलेली गोष्ट न करता इतर गोष्टीस बोल लावणे.
--एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर परिपक्व व्यक्ती सारखं मान्य न करता आपण           काही कमी नाही असे सांगण्याचा आटापिटा करणारे काही महाभाग आपल्या           अवतीभवती असतात, अशा लोकांसाठी ही म्हण वापरली जाते.
-- एखादा वाईट मनुष्य  त्याच्याच कामाच्या वस्तूंवर त्याचा राग काढत असतो.
--आपला उणेपणा झाकण्यासाठी काहीतरी कारण सांगणे.

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम) 
              -----------------------------------------

                      उदाहरण:-----
                      ---------


     नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण आपण खुपदा  ऐकतो. आपल्या आजुबाजुला ही म्हण सार्थक करणारे अनेक आढळतात.

     आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही अशी सरळ सरळ कबुली देण्याची त्यांची तयारी नसते. मग सतत दुसऱ्याला, परिस्थितीला, नशिबाला दोष देत राहणे आणि खोटे का होईना मानसिक समाधान मिळविणे एवढेच या व्यक्तीच्या हातात असते .

     स्मिता रोज आपल्या नोकरीच्या ठिकाणी उशिरा पोहोचते, पण त्या बद्दल अपराधीपणा वाटून न घेता बिनधास्तपणे ऑफिसमधील घड्याळच कसे बरोबर नाही, पुढे आहे, नाहीतर मी बरोब्बर वेळेवरच आले, असा दावाही करते. एखादे काम आपल्याला जमत नसले तरी ते काम करणाऱ्या  इतरांच्या नावाने बोटे मोडु नये, त्यांच्या कामात चुका काढू नये, हे सुमाला कळतच नाही. तिच्या प्रत्येक बिघडलेल्या कामाला इतर कोणीतरी जवाबदार असते असं ती नेहमीच ठोकून देते. समजा तिचा परीक्षेचा पेपर बिघडला तरी ती सांगेल "अगं मला सर्व प्रश्नांची उत्तरे येत होती पण माझं पेनच चालत नव्हतं मी काय करू". विभाताईंच्या मुलाला एसएससीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले तर त्या म्हणतात "बोर्डाचा निकालच खूप कडक लागला हो ! आणि या वर्षीचे पेपर किती कठीण होते" त्या अनिलला भरपूर मार्क्स मिळाले. अगदी पंच्यांशी टक्के ...असं म्हणताच तिचं उत्तर तयार "अहो त्यांच्या सेंटरवर खूप कॉप्या चालल्या म्हणे आमच्या मनूला कुठे जमायला असला प्रकार. तुम्ही तर ओळखताच मनुला किती साधा आहे तो".

     खरं म्हणजे मुलांना परिस्थितीशी दोन हात करायला शिकविण्याऐवजी असल्या पळवाटा शोधुन काढणे त्यांना आपणच शिकवीत असतो आपल्या कृतीतून,बोलण्यातून .आणि कित्येकदा तर पळवाटा काढणे हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन जातो .

     मी नाचले असते हो ,पण अंगण वाकडे आहे ,मी काय करू .


             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कल्पनाविलास .वर्डप्रेस .कॉम)
            ----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2021-शनिवार.