वास्तव चारोळया"वेळा नियमित पाळणारा डब्बेवाला, त्याच्या घड्याळाचा काटा स्थिर झाला

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 02:35:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          विषय : मुंबईचा डब्बेवाला
                        कोरोना गंभीर वास्तव चारोळया
  "वेळा नियमित पाळणारा डब्बेवाला, त्याच्या घड्याळाचा काटा स्थिर झाला"
                                   (भाग-१)
----------------------------------------------------------------

(१)
गाडीच्या खडखडाटात (जेवणाच्या) डब्यांचा खडखडाट
एक संगीत व्हायचे तयार
एकसुरात सारे डब्बेवाले एकसाथ,
प्लॅटफॉर्मवर उतरण्यास असायचे तयार.

(२)
"TIME MANAGEMENT" (वेळ व्यवस्थापन) त्यांच्याकडून शिकावे
वेळा अन शिस्त त्यांनीच पाळावे
एक उदाहरण जगासमोर त्यांचे देत,
"SIX SIGMA" उभी आहे त्यांची दखल घेत.

(३)
जेवणाचे चाकरमान्यांचे घड्याळ तंतोतंत
अचूक नियोजन करीत सारे डब्बेवाले पंत
वेळेवरच डब्बा उचलती घरातून,
वेळेवरच डब्बा आणिती कचेरीतून.

(४)
डब्बेवाल्याना पाहूनच सारे घड्याळ लावतात
त्यांच्या हालचालीवर अचूक वेळा टिपतात
नियोजन,संयोजन वेळेचे त्यांच्या पाहून,
शाळेच्या अभ्यास-पुस्तिकेत त्यांचा धडा छापतात.

(५)
आपणासही डब्बेवाले शिस्त शिकवून जातात
वेळेचे नियोजन सर्वां अंगी बाणवतात
कितीही उशीर, "TIME TABLE" चुकले तरी,
अंगच्या कलागुणांनी ते त्यावरही मात करतात.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.