II स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा.II-स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 10:32:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  II स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा.II
                 -----------------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज १५, ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी भावांस आणि कवयित्री भगिनींस, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, स्वातंत्र्य दिनानिमित्त एक खास भाषण.


                स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण:-----
               -------------------------

      माझे सर्व आदरणीय अध्यापक व अध्यापिका, सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू भगिनींनो माझ्या कडून सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा.

     जसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमुल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपला देश अन्याय कारी ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो होतो. आज आपण येथे 75 व्या स्वतंत्रता दिवसास साजरा करण्यास एकत्र आलो आहोत.

     आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरल्या गेला आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडीत जवाहर लाल नेहरू यांनी सर्व भारतीयांना संदेश देण्याहेतू भाषण केले. ते म्हणाले सर्व जग झोपत आहे आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. सर्वांना स्वातंत्र्याच्या खुप खुप शुभेच्छा.

     ब्रिटिशांशी संघर्ष करतांना आलेले यश त्यांच्या मुखातून मुक्तपणे संचारू लागले होते. आज स्वातंत्र्यतेनंतर भारत सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे. या देशात विविधतेमधे एकता आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, वेश यांची विविधता असतानाही सर्व भारतीय आम्ही एक आहोत हे मोठया उत्साहाने सांगतात. पारतंत्र्यात सामान्य माणसास सुंदर जिवन जगण्याचा शिक्षणाचा आणि आपल्या स्वातंत्र्यास उपभोगण्यास मनाई होती. ब्रिटीशांची वागणूक अत्यंत अमानुषतेची होती. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली त्या विरपूत्रांना मी नमन करतो. त्यांच्या बलीदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या कार्याची आठवण व्हावी यासाठी आपण दरवर्षी स्वतंत्रता दिन साजरा करतो.

     सर्व स्वातंत्र्यता सेनानींच्या अथक प्रयत्नांनी आणि सर्व देशवासीयांच्या उत्कट ईच्छेमुळेच आपण हे महान स्वप्न पाहू शकलो. आज आपण मुक्तपणे श्वास घेवू शकतो. आपल्या पूर्वजांच्या बलीदानास आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांना नमन करून आपण त्यांच्या कार्याचे आभार मानू शकतो.

     भारताचे स्वातंत्र्यतेचे स्वप्नं साकार झाले ते फक्त सर्व देशवासीयांच्या एक होवून इंग्रजांविरूध्द लढण्यामुळेच आपण आपला हक्क मिळवू शकलो. त्यामुळे आपणही आपले सर्व हेवेदावे विसरून एकतेच्या सूराने आपल्या देशांस विकासाच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करावयास समर्थ असावे. महात्मा गांधीनी देशास अहिंसा आणि शांतीच्या महान मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे कार्य इतिहासात प्रेरणेचा एक झरा मानला जातो.

     भारत आपणां सर्वांची मातृभूमी आहे. आपण या विशाल स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशासमोर अनेक बिकट समस्या आहेत त्यामुळे त्या समस्यांना गंभीरपणे आणि एकतेच्या सूत्राने आपणांस समर्थपणे तोंड दयावे लागेल.

     आपणां सर्वांना स्वातंत्र्यतेच्या खुप खुप शुभकामना. आशा करतो की आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपला एक आदर्श स्थापीत करेल . . . जयहिन्द ! जयभारत !


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी .कॉम)
                 --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.