II स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा.II-(लेख क्रमांक-3)

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 05:01:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

              II स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा.II
              ----------------------------------------
                             (लेख क्रमांक-3)
                            -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज १५, ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी भावांस आणि कवयित्री भगिनींस, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वाचूया, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाची माहिती आणि महती.

                        स्वतंत्रता दिवस माहिती:-----
                       ---------------------- 


      १५ ऑगष्ट हा दिवस आपण पवित्र सणा सारखा साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी आपण काही चांगले निश्चय करून देश हिताचे काम करायची शपथ घेतली पाहिजे. ध्वजवंदन करताना त्यापवित्र ध्वजाच्या साक्षीने हि शपथ घ्यायची असते. आपले मुख्य अतिथी ध्वज फडकविल्यांनंतर जन- गण- मन हे राष्ट्र गीत म्हणून नंतर सर्वांनी 'सावधान' तेच्या पावित्र्यात 'झंडा उंचा  रहे हमारा' हे गीत सामुदाईकपणे म्हणायचे असते. देशासाठी प्राण पणाला लावलेल्या क्रांतीवीरांची आठवण करून देणारे हे गीत म्हणजे - स्वर साम्राज्ञी लतादीदी च्या स्वरातील हे गीत एकल्या नंतर खरच त्या क्रांतीवीरांसाठी आपल्या भावनांना पाझर फुटते .. त्यांना आम्हा सर्वांचे शत शत: प्रणाम ! जय हिंद, जय भारत,  "ए मेरे वतन के लोगों , जरा आख में भर लो पानी  । जो शहीद हुए हैं उनकी , जरा याद करो कुर्बानी ।।"  15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला आता पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रीय सण आहेत. भारत आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये दमदारपणे वाटचाल करताना दिसते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या देशभक्तांच्या बलिदानाची आज कुणालाच फिकीर नाही याचा अनुभव वारंवार येतो. राजकीय सत्ता व त्या माध्यमातून मिळणारी अफाट संपत्ती जमा करण्याकडेच राजकारणी मंडळी लक्ष ठेवून आहेत. स्वातंत्र्यदिनदिवशी तिरंगा ध्वजापुढे अभिवादन केले की आपली इतिकर्तव्यता संपली अशी मनोधारणा झालेल्या पुढार्‍यांचे काय करणार? लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते, हेच हे राजकारणी विसरत चालले आहेत. देशावर प्रेम करणे म्हणजे भ्रष्टाचार न करणे, हिंसाचार न करणे, प्रामाणिक वागणे या गोष्टी मनावर ठसणे आवश्यक असताना आजच्या काळात देशभक्तीचीच तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या देशावर सदासर्वकाळ प्रेम केले पाहिजे. देशावर प्रेम म्हणजेच येथील परंपरा, संस्कार आणि सर्वसामान्य लोकांवरही प्रेम करणे आलेच.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीजानकारी .इन)
                --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.