बंध हे......

Started by Ashok_rokade24, August 15, 2021, 05:18:43 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

तूटलेले बंध हे जोडू कसे ,
घावअंतरीचे हे साहू कसे ॥

जरी आले येथे आपले म्हणूनी ,
नाही झाले परी तेआपले कोणी ,
मनाला हे सारे पटवू कसे , 
घाव अंतरीचे...............   ॥

सोडी साथ कुणीअशीअर्ध्यावरी,
वळवून पाठ जाती वार्‍यापरी,
वहाते हे वारे अडवू कसे ,
घाव अंतरीचे...............   ॥

किती स्वार्थी येथेआपुलेअसती,
आपले पणाचा दिखावा करती ,
मोहाचे जाळे आता तोडू कसे ,
घाव अंतरीचे...............   ॥

आता नसे काही हेचअसे जीवन,
सुख दु:खाचेअसे राहील मिलन,
शोधण्या सुख कुठे जाऊ कसे ,
घाव अंतरीचे...............   ॥

अशोक मु.रोकडे .
मुंबई .