भगवंत ??

Started by Ashok_rokade24, August 15, 2021, 05:22:56 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

फासून दगडाला शेंदूर
नांव दिले त्यासी भगवान
त्याने दु:ख न केले कधी दूर
कसे गाऊ त्याचे गुणगान ??

संकट महामारीचे आले
चमत्कार न कुठे घडले
तूफानात घरटे उडाले
झालेआयुष्यहि सुनसान  ॥

छत्र हरपले माता पित्याचे
पोरकी झाली बाळे अजाण
घास भरविला माणसाने
बंदिस्त गाभारी भगवान ॥

माणसात कुठे देव दिसे
कुठे दिसला कधी हैवाण
सहारा माणसाचा विज्ञान
दिले माणसाला जीवदान ॥

जात धर्म सिंहासन सत्ता
यात हरवली नितीमत्ता
भरडून गेली साधी जनता
सुखे निद्राधीन भगवान ॥

न कोणी असे इथे कुणाचा
माणूसकी धर्म माणसाचा
प्रज्ञा शिल करूणा अंतरी
तोच  असे  खरा भगवान  ॥

अशोक मु.रोकडे.
मुंबई.