खंत !!!

Started by Ashok_rokade24, August 15, 2021, 05:26:57 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

सूने सुने मन झाले नयनी आसू
सूकुन गेले |
एकांती बरसात आठवांची भान
हरपून गेले ||

बहर फुलांचा सुगंधीत अवघे
जिवन झाले |
वाहता हवा जहरी बाग फुलांचे
जळून गेले ||

मिळून एकांती सुर्यास्त समयी जे
स्वप्न पाहिले |
जिवन अधूरे स्वप्न अधूरे सारे
विरून गेले || 

का तुफान नयनी उठले शब्दही
हरवून गेले |
महापुरात आसवांच्या दोन जीव
वाहून गेले ||

काय हरवले काय मिळवले न
कधी ऊमजले |
आठवणीत गुंतून राहता सौख्य
सोडून गेले ||

अशोक मु.रोकडे.
मुंबई.