II स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.II- (लेख क्रमांक-4)

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 07:51:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     II स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.II
                    ----------------------------------
                               (लेख क्रमांक-4)
                             -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज १५, ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी भावांस आणि कवयित्री भगिनींस, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वाचूया, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनावर एक विशेष लेख आणि एक प्रसिद्ध कविता.

     १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अविस्मरणीय दिवस आहे. कारण, या दिवशी आपल्या देशाला इंग्रज सरकारच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं होत. तेंव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशांत राष्ट्रीय सन म्हणून साजरा केला जातो.

     देशांतील प्रत्येक राज्याच्या शासकीय व निमशासकीय ठिकाणी या दिवशी झेंडावंदन केले जाते. तसचं, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी या दिनानिमित्त झेंडावंदना सोबतच, राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यानिमित्ताने शाळा महाविद्यातील विद्यार्थी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल भाषण देतात.

     तसचं, देशभक्तीपर गीतांचे पठन करतात. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या कारकिर्दीत देशभक्तीपर गीतांचे लिखाण केलं होत. त्यामुळे त्या क्रांतीकारकाच्या स्मृतीत त्यांनी लिखाण केलेल्या देशभक्तीपर गीतांचे पठन केले जाते.

     क्रांतिकारकांनी आपल्या मनात देशाप्रती असलेल्या प्रेमाच्या भावनेतून या गीतांचे लिखाण केलं आहे. या गीतांचे पठन करतांना आपले मन सुद्धा गहिवरून जाते. शरीरात एका प्रकारची उर्जा संचारते.


                      देशभक्ती कविता:-----
                   -------------------

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले.

राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥
वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन.

हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून.

ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
करि दिव्य पताका घेऊ प्रिय भारतगीते गाऊं.

विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ हे.

जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल.

जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥


     क्रांतिकारकांचे आपल्या देशाप्रती असलेले प्रेम पाहून आपल्या मनात सुद्धा देशभक्ती जागृत होते. खरच, या क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान खूप मोठ आहे. आज आपण या देशांत मुक्त संचार करू शकतो ते केवळ आपल्या देशांतील महान क्रांतीकारकांमुळे.

     आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनाबद्दल लिहावं तितक कमीच आहे.  प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात या क्रांतिकारकांनी हक्काच घर केलं आहे. त्यामुळे त्यांना विसरणे खूप कठीण काम आहे.

     आज सुद्धा देशांतील अनेक कवींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून या क्रांतीकारकांना जागृत ठेवल आहे. तसचं, देशभक्तीपर गीतांचे लिखाण करून यांच्या देशभक्तीच्या कार्याला उजाळा दिला आहे.

     स्वातंत्र्य पूर्व भारतात देशभक्तीपर गीतांचे लिखाण करण्याचा मुख्य उद्देश्य हा देशांतील लोकांच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याप्रती भावना जागृत करणे हा होता. स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं.

     त्यामुळे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत, व राष्ट्रीय गीतासोबतच क्रांतिकारकांच्या कार्याचा गौरव म्हणून इतर देशभक्तीपर गीतांचे पठन करण्यात येते. तसचं, देशभक्तीपर घोषणा दिल्या जातात. या दिवशी देशांत सर्वत्र आनंदमय वातावरण असते. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस राष्ट्रीय सणाच्या स्वरुपात साजरा केला जातो.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी .कॉम)
                -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.