‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "लागला मातीचा जीव झुरणीला"

Started by Atul Kaviraje, August 16, 2021, 01:51:57 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे सातवे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " अशोक कौतिक कोळी " यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -" लागला मातीचा जीव झुरणीला "


                           कविता पुष्प-सातवे
                      "लागला मातीचा जीव झुरणीला"
                    ------------------------------


     पावसाने समाधानकारक आणि वेळेवर हजेरी लावली नाही, तर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो. या शेतकऱ्यांची प्रातिनिधिक भावना व्यक्त करणारी अशोक कौतिक कोळी यांची कविता आज  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये पाहू या.


असो, बरकत धूळपेरणीला,
लागला मातीचा जीव झुरणीला.

हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला,
टिपूर मोत्यांची आस मोरणीला.

येऊ नये कधी दिवस जाचक,
कासावीस डोळे बनले चातक.

कोरडे नक्षत्र पूर पापणीला,
आलेलं आभूट दूर दाटणीला.

मिळता डोळ्यांना मेघुट इशारे,
मातीच्या कणांना फुटते धुमारे.


        - कवी - "अशोक कौतिक कोळी"
        -------------------------------

      (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
    ----------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2021-सोमवार.