"पारसी नवं-वर्ष"-II पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा II-(लेख क्रमांक-१)

Started by Atul Kaviraje, August 16, 2021, 03:17:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "पारसी नवं-वर्ष"
                       II  पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा II
                                (लेख क्रमांक-१)
                      -----------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज या सोमवारच्या दिनी १६.०८.२०२१ ,साल २०२१ चे पारसी नवं वर्ष सुरु होत आहे. माझ्या सर्व पारसी बंधू आणि भगिनींना या पारसी नवं-वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . ऐकुया माहिती पूर्ण लेख.

    पतेती म्हणजे काय? कसा साजरा केला जातो पतेती सण? कशा देतात शुभेच्छा?
पतेती हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा 'पतेती' म्हणून ओळखला जातो.

     पतेती (Pateti 2021) हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार (Zoroastrian Calendar) वर्षाचा शेवटचा दिवस हा 'पतेती' (Pateti Festival 2021) म्हणून ओळखला जातो. या दिवशी ते अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी 'पतेती' (Pateti) सण आहे. तर 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरं करणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ (Nowruz) म्हणून देखील ओळखला जातो. पारशी नूतन वर्षाचा आरंभ 'फरवर्दीन' माहिन्याने होतो.

     पतेती उत्सवाची सुरुवात कशी झाली? (How did the Pateti festival begin) झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार 3000 वर्षांपूर्वी या दिवशी साह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता. पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती दिवस साजरा करण्यास सुरवात केली. पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा असतो.

     कसा साजरा केला जातो पतेती उत्सव? (How is Pateti Utsav celebrated)
हिंदू धर्माप्रमाणेच पारसी धर्माचे लोकही अग्नीची पूजा करतात. हे लोक अग्नीला पवित्र मानतात आणि त्यात यज्ञही करतात. पारशी लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि त्यांच्या पूजास्थळावर म्हणजेच अग्नि मंदिरात जातात आणि प्रार्थना करतात. यानंतर लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. तसेच एकमेकांना घरी जेवणासाठी आमंत्रित करतात. या उत्सवाची तयारी महिनाभरापूर्वी सुरू केली जाते. या दिवशी लोक आपली घरे साफ करतात. फुलांनी आणि रंगांनी घरांची सजावट करतात. तसेच या दिवशी गोड पदार्थांचे सेवन करतात.

     अशा देतात पतेतीच्या शुभेच्छा (These are the wishes of Pateti)
भारतात जवळपास 60 हजार पारशी लोकं राहतात. पारशी लोकांचा धर्म झोरास्ट्रियन आहे, तर 'अवेस्ता' (Avesta) पारशी धर्मग्रंथ हा आहे. तुम्ही देखील तुमच्या पारशी मित्रमैत्रिणींना पारसी नववर्षाच्या शुभेच्छा देत असाल तर 'पारशी नूतनवर्षाभिनंदन' किंवा 'हॅप्पी नवरोझ' असं म्हणून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.


              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया .कॉम /मराठी)
            -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2021-सोमवार.