म्हणी - "छत्तीसाचा आकडा"

Started by Atul Kaviraje, August 16, 2021, 03:17:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "छत्तीसाचा आकडा"


                                 म्हणी
                            क्रमांक - 13
                         "छत्तीसाचा आकडा"
                        --------------------

13. छत्तीसाचा आकडा
----------------------

--विरुद्ध मत असणे.
--विरुद्ध मत  किंवा  स्वभाव  असणे.
--वाकडेपणा.
--यांची तोंडे एकमेकांच्या विरूद्ध दिशेला व परस्‍परांपासून दूर असतात. यावरून ज्‍यांचा  अबोला आहे, जे एकमेकांची तोंडे पाहात नाहीत त्‍यांस म्‍हणतात. वितुष्‍ट
विरूद्धता. याच्या उलट त्रेसष्‍टाचा आकडा.

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
           ----------------------------------------------

--उदाहरण:--'मि. मोले आणि ग्‍लॅडस्‍टन यांच्यांत धर्मसंबंधाने छत्तिसाचा आकडा आहे असे म्‍हणण्यास हरकत नाही.'


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2021-सोमवार.