II पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा II-"पारसी नवं-वर्ष"-लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, August 16, 2021, 10:45:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "पारसी नवं-वर्ष"
                      II पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा II
                             लेख क्रमांक-4
                    ------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज या सोमवारच्या दिनी १६.०८.२०२१ ,साल २०२१ चे पारसी नवं वर्ष सुरु होत आहे. माझ्या सर्व पारसी बंधू आणि भगिनींना या पारसी नवं-वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . ऐकुया माहिती पूर्ण लेख.


                पारसी समाजाचे भारताला योगदान:-----
               -------------------------------

     २००१ च्या जनगणने प्रमाणे भारतात पारसींची संख्या सत्तर हजारापेक्षा कमी आहे. एकंदर लोकसंख्येच्या ०.१ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या या समाजाचे भारताच्या विविध क्षेत्रातील योगदान डोळे दिपवणारे आहे.

१. पारसींनी कधीच अल्पसंख्यांकाचा दर्जा आणि हक्क मागितले नाहीत.
२. पारसींनी कधीच नोकऱ्यामध्ये आरक्षण मागितले नाही.
३. पारसींनी कोणत्याही सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन कधीच केले नाही.
४. पारसींना बहुसंख्यांक हिंदुंची कधीच भिती वाटली नाही.
५. पारसी समाजाने कधीच हिंसक निषेध केला नाही, दगडफेक बाम्बफेक केली नाही. सार्वजनिक मालमत्तेची नासधुस केली नाही.
६.कोणा पारसी माणसाने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भाग धेतला नाही किवा गुंडांची टोळी चालवली नाही.

     भारताच्या प्रगतीमध्ये कोणत्याही समाजापेक्षा पारसी समाजाचे योगदान प्रचंड आहे. भारतासाठी त्यांनी खुप खुप केलं आहे. काही नावे फक्त उदाहरणासाठी.

     उद्योग आणि व्यवसाय - रतन टाटा, जे आर डी टाटा, आदी गोदरेज, शापुरजी पालनजी, सायरस मिस्त्री. रुसी मोदी.

     राजकारण आणि सामाजिक सुधारणा - दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, भिकाजी कामा, दिनशॉ पेटीट.

विज्ञान आणि तंत्रज्ञान - होमी भाभा, होमी सेठना.
संगीत - झुबीन मेहता. फ्रेडी मर्क्युरी.
क्रिकेट - नरी कॉन्ट्रॅक्टर, फारुख इंजीनीयर, बॉबी  तल्यारखान.
कायदेतज्ञ - नानी पालखीवाला, सोली सोराबजी, फली नरीमन. जमशेद कामा.
अभिनय - सोहराब मोदी, पर्सिस खंबाटा, बोमन इराणी, जॉन अब्राहॅम,डेझी इराणी, आदी  मर्झबान, पेरीजाद झोराबियन, सायरस भरुचा, भक्तियार आराणी, दिनशॉ दाजी, पिलु वाडीया. शेहनाज ट्रेझरीवाला, शेहनाज पटेल, बरजोर आणि रुबी पटेल.
लेखन - रोहींग्टन मिस्त्री, फिर्दोस कांगा,फारुख धोडी, बाप्सी सिधवा.
पत्रकारिता -रुसी करंजिया, बेहराम कॉन्ट्रॅक्टर, बाची करकरीया, केकी दारुवाला.
रेसींग - सायरस पुनावाला.
नृत्य - शामक डावर.
ज्योतीष्य - बेजान दारुवाला.
सैन्य - फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जनरल एफ एन बिलीमोरीया., मेजर जनरल सायरस  पिठावाला, जनरल खंबाटा.

     आणि केकी मिस्त्री, डॉ  सिलु पोचखानवाला, फिजा शाह, मेहरबुन इराणी, मिकी कॉन्ट्रॅक्टर अर्झबान खंबाटा, कावसजी जहांगीर, होमी वाडीया, अर्देशीर इराणी, ही यादी मोठी आहे. इतर अनेक आणि अनेकांचा उल्लेख करता येवू शकेल.

     पारसी म्हणजे सुसंस्कृत, गुणवत्ता,नितीमत्ता आणि व्यवसायाशी प्रामाणिक असणारा, सर्वांशी मिळुन मिसळुन वागणारा स्वाभीमानी तसाच शांतताप्रिय समाज.समाजात मिळुन मिसळुन कसं वागावं आणि आपली त्याचबरोबर साऱ्या समाजाची प्रगती कशी करावी हे इतर अल्पसंख्यांक समाजांनाच नाही, तर बहुसंख्यांकाना त्यांच्याकडुन शिकायची गरज आहे.

      पारसी नववर्ष नवरोझच्या शुभेच्छा !!!

                       (संकलक-भरत वटाणे)
                   -----------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सूत्रसंचालन .कॉम)
               ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2021-सोमवार.