II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II - शुभेच्छापर संदेश

Started by Atul Kaviraje, August 19, 2021, 02:35:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   श्रावण मासाची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ते, काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.

     शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते. यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.


                🌳श्रावण महिना शुभेच्छा मराठी 🌳:-----
               ---------------------------------

     श्रावण महिना म्हणजे हिरवळ आणि निसर्गाचे खुलणारे रूप आपल्याला पाहायला मिळते.पावसाळी ऋतू मुळे थंड आणि फ्रेश वातावरण असते . असे श्रावण महिन्याचे निसर्ग सौंदर्य दाखवून देणारे श्रावण निसर्ग कोट्स.


(1) चाहूल तुझी लागताच येते,
मन बहरून.
     अशा या श्रावण महिन्याच्या
     भरभरून शुभेच्छा!

(2) आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने प्यावा,
वर्षाऋतू तरी.
     श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा.


                   🌿श्रावण महिना स्टेटस मराठी 🌿:-----
                  -------------------------------

(1) हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला.
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(2) आनंद माझ्या मनात माईना,
सृष्टी सजली बदलली दृष्टी
घेऊन सरींवर सरी आला,
तो माझ्या अंगणी.
     श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!


                    🍁श्रावण महिना शुभेच्छा संदेश मराठी 🍁:-----
                  ----------------------------------------

(1) घेतलीच नाही क्षणभरही उसंत,
अशीही श्रावणातील सरींची भ्रांत.
     श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

(2) कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा,
    लाडका महिना श्रावण.


                       🍀श्रावण महिना संदेश मराठी 🍀:-----
                      --------------------------------

पावसाने भिजून जाई अवखळसा
किनारा, श्रावणाच्या,
चाहुलीने हर्षे निसर्ग सारा.

संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या,
आला तो श्रावण पुन्हा आला...
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी .कॉम)
                  ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.08.2021-गुरुवार.