मोक्ष

Started by siddhesh 68, August 21, 2021, 01:53:32 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68



तु मला भेटली उभी,
ओठांवर स्मित डोळ्यात नमी,
स्पर्शात तुझ्या ओलावा आणि प्रेमळ   उब,
बेभान मी झालो खूप..

जेव्हा तू होते राणी,
मी तुझा नृप,
मी जणू उडतो नभात,
तुला ठेवून पूर्ण  अमलात..

मन जुळले मनाला,
अंग जुळले अंगाला,
पाजळते द्रव्य विश्वात,
अनुभवली आज आपण प्रीत श्वासोश्वासात..

अनादी आहे सुरुवात,
अज्ञात आहे अंत,
उगाच केली आपण खंत,
परिपक्वत्वाचा हाच कळस,
हाच का तो मोक्ष, जे सांगतात संत?

सिद्धेश सुधीर देशमुख
Pune