‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे"

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 12:28:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे बारावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " ना. धों. महानोर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -"ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे"


                            कविता पुष्प-बारावे
                      "ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे"
                    -------------------------------

                     

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
     कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे....

'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज निसर्गकवी ना. धों. महानोर यांची 'ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे' ही कविता...

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला,
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे.

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली,
पाखरांशी खेळ मी मांडून गावे.

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता,
शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे.


                     कवी - ना. धों. महानोर
                    ---------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
-------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.