II रक्षा बंधन शुभेच्छा II - क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 02:16:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II रक्षा बंधन शुभेच्छा II
                                         क्रमांक-१
                                -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. आजचा हा  म्हणजे  दिनांक -२२.०८.2021 चा सुमुहूर्त आपल्या मराठी माणसाचे दोन पुनीत, पावन असे सण घेऊन आलाय , ते म्हणजे, रक्षा बंधन ,आणि नारळी पौर्णिमा . मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-बंधूस आणि कवयित्री भगिनींस रक्षा - बंधन आणि नारळी पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा. आता वाचूया रक्षा बंधनावर काही शुभेच्छा संदेश -


                    रक्षा बंधन शुभेच्छा  क्रमांक-१ :-----
                  ----------------------------


1)  हैप्पी रक्षाबंधन दादासाठी--
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसा  मात्र मोजावे लागेल...
Happy Rakshabandhan दादा !
     हैप्पी रक्षाबंधन दादासाठी.

2) श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा,
     भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

3) ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो...
     राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

4)  रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा,
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा...
     राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

5)  रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे  प्रेम जगावेगळे...
     रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6)  तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे,
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे,
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे,
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे...
     रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
     ताईला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

7)  ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले...
     ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !


                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीमराठी एस एम एस .कॉम)
               -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.