II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II-शुभेच्छापर संदेश

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 11:00:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II
                     ---------------------------------
                     
                   
मित्र/मैत्रिणींनो,

   श्रावण मासाची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ते, काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.

     शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते. यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.


                🌳श्रावण महिना शुभेच्छा मराठी 🌳:-----
               --------------------------------

                🍃श्रावण महिना मराठी 🍃:-----
                -------------------------

(1) बेभान मुक्त वारा केसांशी
खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून,
बेधुंदपणे त्यात रमेल!

(2) श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे.
     श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

                  🌴श्रावण महिना कविता मराठी 🌴:-----
                 --------------------------------

(1) सुरू होणारा हा श्रावण तुमच्या
मनाला सुख,
शांती आणि समाधान लाभणारा,
ठरू दे हीच सदिच्छा!

(2) येण्याने तुझ्या मन येई मोहरून,
देही जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब,
श्रावण येई असा बरसून.
     श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

                     🌻श्रावण महिना  शुभेच्छा  🌻:-----
                     --------------------------

(1) हासत – गात, घेऊन सरींची
बरसात
आला तो मनमोहक,
माझा श्रावण महिना !

(2) जरासा हासरा, जरासा लाजरा
सणासुदीची परंपरा राखण्या,
आला श्रावण आला.
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

               🌿श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी  🌿:-----
               ------------------------------------

(1) रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण,
फुलाफुलांत उमलला श्रावण.
     श्रावण महिन्याच्या तुम्हा
     सर्वांना भरभरून शुभेच्छा!

(2) श्रावणात पावसाने कमालच केली,
धो धो कोसळून धमालच केली,
अशाच मनसोक्त धारांसाठी.
     श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!

                    🌳श्रावण कोट्स इन मराठी 🌳:-----
                    ----------------------------

(1) निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही
शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या,
आलाय श्रावण भिजून घ्या.

(2) सणासुदीची घेऊन उधळण,
आला हसरा श्रावण..!
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण..!
परंपरेचे करूया सर्व मिळुन जतन..!
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण..!
आला हसरा श्रावण..!
     'श्रावणा'च्या मंगलमय शुभेच्छा!


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी .कॉम)
                -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.