II रक्षा बंधन शुभेच्छा II-शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 05:35:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II रक्षा बंधन शुभेच्छा II
                                    शुभेच्छा  क्रमांक-3
                                -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. आजचा हा  म्हणजे  दिनांक -२२.०८.2021 चा सुमुहूर्त आपल्या मराठी माणसाचे दोन पुनीत, पावन असे सण घेऊन आलाय , ते म्हणजे, रक्षा बंधन ,आणि नारळी पौर्णिमा . मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-बंधूस आणि कवयित्री भगिनींस रक्षा - बंधन आणि नारळी पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा. आता वाचूया रक्षा बंधनावर काही शुभेच्छा संदेश -


                    रक्षा बंधन शुभेच्छा  क्रमांक-3 :-----
                   ----------------------------


15)  काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करून देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल...
     रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

16)  कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे...
     रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

17)  राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा...
     रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

18)  बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी...
    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

19)  प्रत्येकाला एक बहिण असावी,
मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी,
पण एक बहिण असावी...
मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी,
लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी ,
मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी,
लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी,
लहान असो वा मोठी,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी...
मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी,
लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा "म्हणणारी,
लहान असो वा मोठी,
एक बहिण प्रत्येकाला असावी...
आपल्या एखाद्या मैत्रिणीला "वहिनी"
म्हणून हाक मारणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी...
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी,
लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी,
ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही,
तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी,
स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी......!
     रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

20)  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल...
  रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीमराठी एस एम एस.कॉम)
               -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.