II रक्षा बंधन शुभेच्छा II - निबंध (क्रमांक -3)

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 08:48:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II रक्षा बंधन शुभेच्छा II
                                   निबंध (क्रमांक -3)
                               -----------------------
मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. आजचा हा  म्हणजे  दिनांक -२२.०८.2021 चा सुमुहूर्त आपल्या मराठी माणसाचे दोन पुनीत, पावन असे सण घेऊन आलाय , ते म्हणजे, रक्षा बंधन ,आणि नारळी पौर्णिमा . मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-बंधूस आणि कवयित्री भगिनींस रक्षा - बंधन आणि नारळी पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा. आता वाचूया रक्षा बंधनानिमित्त  माहितीपर निबंध--


                      " रक्षाबंधन " मराठी निबंध (क्रमांक - 3)
                      ------------------------------------


                  रक्षाबंधन बहीण- भावाचे नाते :-----
               -----------------------------

     बहिण कितीही मोठी झाली, किंवा भलेही तिचे लग्न सुद्धा झाले ती किती श्रीमंतही झाली. तरी तिची जबाबदारी के तिच्या भावावरच असते याचा अर्थ ती कमजोर नाही तर भावाचे कर्तृत्व हे महान आहे आणि बहिणीचा भावावर असलेला विश्वास खूप मोठा आहे.

     बहिण- भाऊ हे फक्त रक्ताचेच असावे असे काही नाही. विश्वातील प्रत्येक स्त्री ही भावाला बहीण प्रमाणेच वाटावी व यां विश्वातील प्रत्येक पुरुष बहिणीला भावा प्रमाणेच असावा.

     म्हणून बहिण – भाऊ हे फक्त रक्ताचे असो किंवा मानलेले असो पण त्यामागचे संबंध, भावना ह्या पवित्रच असाव्यात आणि या नात्यामागची कृतज्ञता जोपासणारा, बहिण- भावाचे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा.

     म्हणून ज्या बहिणीला, स्त्रीला भाऊ नसतो ती बहिण चंद्राला आपला भाऊ समजून चंद्राची पूजा करते व चंद्राला ओवाळते म्हणून लहानपणा पासून आपल्याला चंद्राला चंदा मामा असे म्हणून म्हणायला सांगितले जात होते.

     तसेच, ज्या बहिणीला भाऊ नाही ती बहीण रक्षाबंधन दिवशी देवाला गणपती बाप्पा ला आपला भाऊ समजून राखी बांधते व सदैव माझे रक्षण कर अशी प्रार्थना करते.

                   आधुनिक काळाचा रक्षाबंधन :-----
                  ---------------------------

     आज बाजारपेठेत अनेक प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राखी खरेदी करतात. काही जणांचा भाऊ नोकरीसाठी बाहेर देशात किंवा शहरात असल्याने इंटरनेट द्वारे, मेसेज द्वारे, मेल, कुरियर अशा सोयीस्कर पद्धतीने राखी पाठवून हा सण साजरा केला जातो.

     तसेच आज हा सण फक्त भाऊ- बहिणीसाठी राहिला नाही तर मुलगी- वडील, चुलत भाऊ, मामे भाऊ किंवा मित्र यांनासुद्धा एक भावाचा दर्जा देऊन हा सण साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्व नात्यांमध्ये एकजुटीचे वातावरण होत आहे.

     या सणाच्या परंपरा भविष्यामध्ये सुद्धा अश्याच चालत रहाव्या म्हणून शाळा, महाविद्यालय यामध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो तर काही मुली झाडे- झुडपांना राखी बांधतात, त्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण कमी व्हावी म्हणून.

     अशा प्रकारे आजच्या जगात हा सण आगळ्या – वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. अशा तऱ्हेने भारतीय संस्कृती मधील बहिण- भावाच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्ष भरा मध्ये बहिण- भाऊ कसे ही राहो.

     किती ही राग अथवा भांडण असो पण या रक्षाबंधन दिवशी बहिण- भावासाठी सर्व काही असते व तिनी बांधलेल्या राखी चे मोल सुद्धा भावासाठी अनमोल असते. बहिण- भावाचे हे प्रेमळ नाते भविष्या मधील पिढ्यां मध्ये असेच टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने दर वर्षी येणारा हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला पाहिजे.

     व याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले पाहिजे. भाऊ ज्या प्रमाणे आपल्या बहिणीची माया करतो तिचा सन्मान करतो त्या प्रमाणेच त्या इतर स्त्रीला सुद्धा बहिणी प्रमाणेच समजून तिच्या सोबत वागले पाहिजे त्यामुळे समाजात मुली बद्दल असलेली भीती नाहीशी होईल.

     भारत संस्कृती मध्ये अशाप्रकारे बहीण- भावाच्या नात्याचा मान ठेवणारा व त्यांची मने जोपासणारा हा सण. बहिणी किती दूर असो आपल्या भावापासून तरी सुद्धा रक्षाबंधनाच्या या शुभ दिनी ती आपल्या भावाकडे येते व तू माझे रक्षण कर म्हणून रेशमी गाठ असलेली राखी आपल्या भावाला बांधते.

     व भाऊ सुद्धा कितीही महत्त्वाची कामे असली तरी राखी बांधण्यासाठी वेळ काढतो व बहिणीचे रक्षण सदैव करेल याची ग्वाही देतो.

     अशा प्रकारे संपूर्ण देशामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.


             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमित्र .इन)
            -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.