नाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात)

Started by dinesh.belsare, March 24, 2010, 03:59:03 AM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

नाते खूप विलक्षण असतात
कधी हसवतात,कधी रडवतात
कधी दूध-भातासारखे मऊ
तर कधी तक्ताडनारे शूल भासतात

जखमांवर फुंकर घालणारे तेच
त्यांना ओरबाडनारे असतात
कधी मायेचा ओलावा
तर कधी जळजळीत निखारे असतात

अश्रू पुसणारे तेच हात
मदतीचा आधार झिडकारतात
कधी आनंदाने गलबलून
तर कधी द्वेषाने पेटून उठतात

पावलागणिक उमेद ज्यांची
त्यांचीच कट्यारे पाठीत निघतात
जगतांना राग अन मत्सर बाळगणारे
मरणाला मात्र उपस्थित असतात...
                                            ..... दिनेश.......

gaurig


aspradhan


santoshi.world