II नारळी पुनवेच्या हार्दिक शुभेच्छा II - (कविता - अ)

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 11:55:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        II नारळी पुनवेच्या हार्दिक शुभेच्छा  II
                                      (कविता - अ)
                      ------------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. आजचा हा  म्हणजे  दिनांक -२२.०८.2021 चा सुमुहूर्त आपल्या मराठी माणसाचे दोन पुनीत, पावन असे सण घेऊन आलाय , ते म्हणजे, रक्षा बंधन ,आणि नारळी पौर्णिमा . मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-बंधूस आणि कवयित्री भगिनींस रक्षा - बंधन आणि नारळी पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा. आता वाचूया नारळी पौर्णिमेनिमित्त काही कविता --

                               नारळी पौर्णिमा (कविता क्रमांक-१)
                             ---------------------------------


सण हा नारळी पौर्णिमेचा
सागरपुत्रांच्या आनंदाचा

दर्या राजा असे देव त्यांचा
रक्षणकर्ता तो सकलांचा

सारे त्याला श्रीफळ वाहती
मनोभावाने पूजन करती

सागरा, हो आम्हावर प्रसन्न
आम्हा सर्वांचे करी रक्षण

बहीण सासरहून माहेराला
येते भावा राखी बांधायला

धागा पवित्र असे रेशमाचा
भाऊ बहिणीच्या बंधनाचा

बांधून ती राखीचा प्रेमधागा
आपल्या भावा करते जागा

भाऊ समजून घे रक्षाबंधन
वृत्ती, दृष्टीचे कर तू रक्षण

मान साऱ्या स्त्रिया बहिणी
पूज्य भाव ठेवावा तू मनी

भाऊ बहिणीच्या आनंदाचा
सण हा नारळी पौर्णिमेचा.

                               नारळी पौर्णिमा (कविता क्रमांक-2)
                             ---------------------------------
   
सण राखी पौर्णिमेचा
भावा ओवाळी बहिण
असे ओलावा मायेचा
सुख नयनी वाहिन ।।

आज नारळी पौर्णिमा
सण भाऊ बहिणीचा
बंधूराया ओवाळीते
क्षण अती आनंदाचा ।।

पाठीराखा भाऊ माझा
त्याची वेडी असे माया
किती पडलं संकट
धरी माझ्यावर छाया ।।

मागे बहिण भावाला
ठेव माय बापा सुखी
नको मला साडी चोळी
घाल घास त्यांच्या मुखी ।।

माय बापाहूनी मोठं
नाही जगामध्ये कोणी
होई त्यांचा पाठीराखा
हीच मला ओवाळणी ।।

सण नारळी पौर्णिमा
मोठा मच्छीमारांसाठी
कोळी नारळ वाहून
भरी सागराची ओटी । I


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)     
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.