II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II - शुभेच्छापर संदेश

Started by Atul Kaviraje, August 23, 2021, 11:27:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II
                     ----------------------------------
                     
                   
मित्र/मैत्रिणींनो,

   श्रावण मासाची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ते, काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.

     शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते. यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.

                🌳श्रावण महिना शुभेच्छा मराठी 🌳:-----
               ---------------------------------

                  🍀श्रावण सुविचार व लघु कविता मराठी 🍀:-----
                ----------------------------------------

(1) श्रावणात घननिळा बरसला,
रिमझिम रेशिमधारा उलगडला
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी,
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी.

(2) परंपरेचे करूया जतन,
आला आहे श्रावण.
     श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
     
(3) निसर्ग आलाय बहरून
मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या,
मन होई पाखरू पाखरू.
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(4) कोवळ्या उन्हासोबत
आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर,
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर.
     श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

(5) श्रावण महिन्याच्या हिरव्यागार शुभेच्छा!
तुमचं आयुष्यही सदैव.
असं टवटवीत राहो हीच सदिच्छा!

(6) सरीवर सरी येतात आणि मन
जातात भिजवून
श्रावण आला सांगतच,
येतात अगदी धावून!

(7) यक्षप्रश्न मनी आला
का बरे निसर्ग गाऊ लागला
संगती झाडे वेली
अरे खुल्या मना रे,
हा बघ श्रावण आला.

(8) आकाशी मेघ गरजती,
गुंफूनी माळा, मन चिंब भिजवूनी,
जाई हा मनी वसणारा पावसाळा.
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(9) नटली सृष्टी बदलली दृष्टी,
आनंद मावेना मनात
हासत, नाचत, गात-गात श्रावण,
आला अंगणात.
     श्रावण मासाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

(10) बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या,
आलाय पाऊस भिजून घ्या.
     श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी .कॉम)
                -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2021-सोमवार.