प्रेम हे प्रेमच असत.....

Started by अतुल देखणे, March 24, 2010, 08:31:44 AM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

प्रेम हे प्रेमच असत...........
मनातल गुज मनाशी साधत हेच प्रेम असत...
एकाच्या मनातील भाव दुसरयाच्या चेहरयावर दिसन,
हेच प्रेम असत..............

एक मन सांगन्यास आतुर दुसर ऐकण्यास आतुर असत,
हेच प्रेम असत......

मनात स्फुर्ती डोळ्यात मुर्ती, मनच घर अन मनच दार असत,
हेच प्रेम असत....

हृदयाच्या कोनात अन डोळ्यांच्या खोलात लपवलेल असत,
हेच प्रेम असत.........

म्हणून प्रेम हे प्रेमच असत....., ते नकळतच होवून जात असत...........

अतुल देखने

sujata