II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II - शुभेच्छापर संदेश - (लेख)

Started by Atul Kaviraje, August 23, 2021, 07:00:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II
                       II श्रावण सोमवार शुभेच्छा-२०२१ II 
                    -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

   श्रावण मासाची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ते, काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.


                     II श्रावण सोमवार शुभेच्छा-२०२१ II       
                                    (लेख)
                    ---------------------------------


     शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते. यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.या महिन्यात शिवभक्त सोमवारी व्रत, रुद्राभिषेक, कावड यात्रा आणि मंत्रांचा जप करून भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

     आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना या श्रावण सोमवार शुभेच्छा संदेश आणि मंत्रांसह श्रावण सोमवार, पवित्र महिन्याच्या आगमनाच्या शुभेच्छा द्या.

                       श्रावण सोमवार शुभेच्छा:-----
                      ----------------------

                🙏हैप्पी श्रावण सोमवार मराठी.🙏:-----
               ---------------------------------

(1) बम भोले डमरूवाला शंकराचं
नाव आहे गोड
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं
नाव आहे गोड
शंकराची ज्याने पुजा केली मनोभावे
भगवान शंकराने नक्कीच,
आयुष्य त्याचे सुधारले.
     🌿श्रावण मांस हार्दिक शुभेच्छा!🌿


(2) शिव शंकरांचा महिमा अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी,
आनंदच आनंद देवो...
     🌿ओम नमः शिवाय !
       हैप्पी श्रावण मास!🌿

(3) देवाधिदेव महादेव म्हणती जयांसी
आराध्यदैवत सकल शिवभक्तांसी
भोळा सांब म्हणती तुम्हांसी,
नमो नमो हे कैलासवासी.
     🌿हैप्पी श्रावण सोमवार.🌿

(4) अदभुत आहे तुझी माया
नीळकंठाची तुझी छाया
अमरनाथमध्ये केला वास,
तुच आमच्या मनात वसलास.
     🌿हर हर महादेव...
       श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!🌿


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2021-सोमवार.