म्हणी - "दुष्काळात तेरावा महिना"

Started by Atul Kaviraje, August 24, 2021, 11:20:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "दुष्काळात तेरावा महिना"


                                    म्हणी
                                 क्रमांक -21
                           "दुष्काळात तेरावा महिना"
                          ------------------------


21. दुष्काळात तेरावा महिना
     ----------------------

--संकटात अधिक भर पडणे.
--अडचणीची गोष्ट लांबून सोपी वाटते, पण प्रत्यक्ष करायला गेल्यास त्यातील अडचणी कळून येतात.
--आधीच संकटात असताना आणखी संकट येणे.
--ज्या वर्षीं दुष्काळ पडावा त्याचवर्षीं अधिक महिना यावा. आधीच अडचण असतांना त्यात आणखी भर पडणें.
-- एक संकट असताना अजून संकट येणे.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                -------------------------------------------

                            उदाहरण:--
                           ---------

     नुकतीच बातमी आली - म्हणे चलनवाढ, महागाई गेल्या अनेक वर्षांतील निचांकावर! सगळे काही स्वस्तच स्वस्त आणि पुढच्या वर्षी ही वाढ १% वर येणार.

     आधीच मालकवर्ग आम्हाला 'मंदी', घटता नफा, घटती उलाढाल, नोकरकपात वगैरेचा बागुलबुवा दाखवुन घाबरवत आहे आणि आता ही बातमी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. हातात कोलीत मिळालेल्या माकडागत आता मालक लोक सांगणार, अरे लेको दरवाढ खल्लास, स्वस्ताई येत्त्ये; मग तुम्हाला पगारवाढ सोडाच, पगारकपात करायला हवी!

     महागाई घटली म्हणजे नक्की काय झाले? काय स्वस्त झाले? कटिंग, वडापाव, भाज्या, धान्य सगळे आहे तसे आहे. नाही म्हणला इंधन स्वस्त झाले पण वाहतुक दर वा भाडी छदामभरही घटली नाहीत.

     दरवाढ वा घट निश्चित करताना नक्की काय बघतात?

     सामान्य माणसाच्या क्रयव्यवहारात कोणते घटक किती प्रमाणात आहेत हे बघीतले जाते का? मोटारी/ नवी बांधकामे स्वस्त झाली, मॉल नी काही भेटी देऊ केल्या वा सूट देऊ केल्या तर त्याचा अर्थ महागाई घटली असा होतो का?

     सर्वसामान्य माणसाचा रुपया खर्च होतो तेव्हा त्यात अन्न, वस्त्र, वाहतुक, संपर्कसाधन,वीज, पाणी, कर, बचत,घर्खरेदी , मोटार खरेदी, चैनीच्या वस्तु वगैरे घटकांचा त्यातला हिस्सा किती असतो? रुपयातले किती पैसे जीवनावश्यक वस्तूंवर, किती सुखसोयींवर आणि किती चैनीवर / नफाजनक गुंतवणुकीवर खर्च होतात याचे काही कोष्टक आहे का?

     अन्न धान्य दर घटले नाहीत, भाडे घटले नाही, वीज महागत आहे, कर आहेत तसेच आहेत, मग महागाई निर्देशांक निचांकाला उतरला यात कितपत तथ्य आहे?

     की हे सर्व मतदारांना भुलविण्याचे उद्योग?


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.08.2021-मंगळवार.