IIश्री गणेशाय नमःII-संकष्टी चतुर्थी-"II सुखकर्ता दुःखहर्ता,वार्ता विघ्नाची II

Started by Atul Kaviraje, August 25, 2021, 11:00:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    IIश्री गणेशाय नमःII
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी बुधवार. सोबत श्री गणेश संकष्टी चतुर्थी चा ही शुभ वार घेऊन आला आहे. श्री गणेश चरणी वंदन करून, जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे महत्त्व, माहिती , पूजा विधी, आणि रामदास स्वामी रचित सर्व कार्यात, आरतीत प्रथम म्हटली जाणारी, गायली जाणारी श्री गणेश आरती- "II सुखकर्ता  दुःखहर्ता, वार्ता  विघ्नाची II"


    Sankashti Chaturthi 2021 | संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व:-----

     भगवान गणेशाला बुद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून पूजले जाते. संकष्टी म्हणजे अडचणींपासून मुक्ती. असे मानले जाते की भगवान गणेश भक्तांच्या समस्या दूर करतात आणि अडथळे दूर करतात. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते.

     यावेळी ती बुधवार 25 ऑगस्ट रोजी पडत आहे. आनंदी जीवनाचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी भक्त गणपतीची पूजा करतात. तसेच, हिंदू पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान शिवाने आपल्या पुत्र गणेशाचे नाव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले होते.


               संकष्टी चतुर्थी 2021 : तिथी आणि मुहूर्त:-----
              -------------------------------------

🔶 गोधुली पूजा मुहूर्त – 6: 37 ते 7: 03

🔶 चतुर्थी 25 ऑगस्ट रोजी – 4 वाजून 18 मिनिटांपासून सुरु होईल

🔶 चतुर्थी 26 ऑगस्ट रोजी – 5 वाजून 13 मिनिटांनी संपेल

🔶 ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4:37 ते 5:11

🔶 अमृत ​​काळ – 3:48 ते 5: 28

🔶 सूर्योदय – सकाळी 5 वाजून 56 मिनिटांनी

🔶 सूर्यास्त – सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी


                      संकष्टी चतुर्थी 2021 : महत्त्व:-----
                     --------------------------

     संकष्टीचा संस्कृत अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्ती. संकष्टी चतुर्थी हा गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. वर नमूद केल्याप्रमाणे, या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले. कोणतीही विधी किंवा नवीन उपक्रम सुरु करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. त्याची ज्ञानाची देवता म्हणूनही पूजा केली जाते आणि ते विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध आहे.


                    संकष्टी चतुर्थी 2021 : पूजा करण्याची पद्धत:-----
                   ----------------------------------------

💠 सकाळी लवकर उठून गणपतीला पाणी अर्पण करा आणि त्यांची पूजा करा.

💠 दिवसभर उपवास ठेवा, याने सर्व इच्छा पूर्ण होतील असा विश्वास आहे. दिवसा तांदूळ, गहू आणि डाळींचे कोणत्याही स्वरुपात सेवन करणे टाळा.

💠 संध्याकाळी दुर्वा, फुले, अगरबत्ती आणि दिव्याने गणपतीची पूजा करा.

💠 पूजेच्या पूर्ण विधी परंपरेनुसार गणेश मंत्रांचा जप करा.

💠 गणपतीला अत्यंत प्रिय असणारे मोदक आणि लाडू अर्पण करा.

💠 चंद्रोदयापूर्वी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते.

💠 चंद्रोदयानंतर उपवास सोडा. चंद्राचे दर्शन होणे खूप शुभ आहे. म्हणून जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा अर्घ्य अर्पण करा.

💠 मान्यतेनुसार, गणपतीला तुळशी आवडत नव्हती, म्हणून त्यांची पूजा करताना त्यांना तुळशीची पाने कधीही अर्पण करु नका.


             (साभार आणि सौजन्य-लेखक-टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम)
            -----------------------------------------------------

                      (संदर्भ- टी व्ही ९ मराठी .कॉम)
                     -----------------------------


                   रामदास  स्वामी रचित गणेश आरती ( भक्ती-काव्य )
                                II श्री गणेश आरती II
                     "II सुखकर्ता  दुःखहर्ता, वार्ता  विघ्नाची II"
                --------------------------------------------------


सुखकर्ता  दुःखहर्ता,  वार्ता  विघ्नाची  ||
नुरवी  पूर्वी  प्रेम,  कृपा  जयाची  ||
सर्वांगी  सुंदर,  उटी  शेंदुराची  ||
कंठी    झळके , माळ  मुक्ताफळांची ||
जयदेव  जयदेव,  जय  मंगल  मूर्ती  ||
दर्शन  मात्र  मन : कामना  पूर्ती  II
जय देव, जय देव  ||

रत्नखचित  फरा  तुज गौरीकुमरा  ||
चंदनाची  उटी,  कुंकुमकेशरा  ||
हिरेजडित  मुकुट,  शोभतो  बारा  ||
रुणझुणती  नूपुरे, रुणझुणती  नूपुरे,  चरणी  घागरिया  ||
जयदेव  जयदेव,  जय  मंगल  मूर्ती  ||
दर्शन  मात्र  मन : कामना   पूर्ती  II
जय देव, जय देव  ||

लंबोदर  पितांबर,  फणीवरवंदना  ||
सरळ  सोंड,  वक्रतुंड  त्रिनयना  ||
दास  रामाचा , वाट  पाहे  सदना  ||
संकटी  पावावे,  निर्वाणी  रक्षावे,  सुरवरवंदना  ||
जयदेव  जयदेव , जय  मंगल  मूर्ती  ||
दर्शन  मात्र  मन : कामना   पूर्ती  II
जय देव, जय देव  ||


                         गायक : श्री. रवींद्र साठे
                        -----------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.08.2021-बुधवार.