अजून ही मी जिवंत आहे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 26, 2021, 01:44:08 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक..अजून ही मी जिवंत आहे*


श्वासाशी घट्ट मैत्री करून ठेवली आहे
दीर्घ श्वास घ्यायचा आहे अजून मला तुझ्या मांडीवर
किती दिवस लावणार आहेस कोणास ठाऊक तू
नजरेवर अजून किती भार देऊ सांग
मी गुन्हे गार होईल गं त्या नजरेचा
मी खूप त्रास देतोय तिला सताड उघड ठेऊन....

हे ऐकून.....

कदाचित तुझे ही डोळे पाणावतील
रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे......

मृत्यू रोज येतो ग मला वाटेत आडवा
पण त्याला रोज विनववणी करतो मी
अरे ती येईल शेवटचं ओवाळेल मला
मग निवांत घेऊन जा बिनधास्त पणे
असा डोई वर पदर घेऊन आवरून सावरून
येईलच ती त्या वाटेवरून जिथून ती गेली होती

त्या वाटेला अजून किती थांबवू सांग तू
मी गुन्हेगार होईल ग त्या वाटेचा
मी खूप त्रास देतोय तिला रोज विश्वास देऊन....


हे ऐकून.....

कदाचित तुझे ही डोळे पाणावतील
रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे.....

अस सहजच सोडून जाईल वाटलं तुला
अगं वेडे प्रेम केलंय मी तुझ्यावर जिवापाड
तुला आठवतंय ना का ते पण विसरलीस तू
नाही ना सांग ना नाही ना मग असा का वेळ लावलास
काळजाची धडधड ही विचार करून ठोके देते गं आता
नाही राहवत पण काय करू शब्द पाळतोय तू दिलेला
एकांतात बसून कोऱ्याकागदावर रेखाटतोय तुला

त्या कागदाला किती दोष देऊ सांग तू
मी गुन्हेगार होईल गं त्या कागदाचा
मी खूप त्रास देतोय त्याला तुझे चित्र रेखाटून....

हे ऐकून....

कदाचित तुझे ही डोळे पाणावतील
रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे.....

आता शेवटच विचारणं धाडलं आहे बघ
जमलं तर ये नाय तर येऊ नकोस तू
पण हो तुझ्या नावाचं नव कापड पाठवून दे तेव्हडं
मी चालवून घेईल तेव्हढीच तुझी शेवटची भेट
तेव्हडीच थोडी शांत झोप येईल गं बाकी काही नाही
तुला त्रास नाय देणार आता तू निवांत सुखी रहा
फक्त एक निरोप पाठवून दे त्याला लटकवून ठेऊ नका
त्याला मोकळं करा बंधनातून प्रेम विरहाच्या
बस्स बाकी काही नको.....

कारण त्या दोरीला किती दोष देऊ सांग तू
मी गुन्हेगार होईल गं त्या दोरीचा
मी खूप त्रास देतोय तिला असं एकांतात लटकून....

हे ऐकून.....

कदाचित तुझे ही डोळे पाणावतील
रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे......
रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे......

✍🏻 कविराज...अमोल शिंदे

मो..९६३७०४०९००.अहमदनगर