मार्मिक चारोळ्या-"जीभ उचलली, लावली टाळूला, जीभ घसरली, सज्ज व्हा बदनामीला"

Started by Atul Kaviraje, August 26, 2021, 02:22:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                वास्तव राजकारणी मार्मिक गंभीर चारोळ्या
           विषय : " नेत्यांची एकमेकांवरील शाब्दिक घसरगुंडी "
  "जीभ उचलली, लावली टाळूला, जीभ घसरली, सज्ज व्हा बदनामीला"
-------------------------------------------------------------
                                (भाग-१)


(१)
नेतेपद भूषवताना "आल्याचं" पाहिजेत ?
तोंडातल्या तोंडात "घोळल्या" पाहिजेत ?
बाहेर पडताना  "लोळल्या" पाहिजेत ?
तावून-सुलाखून "जिभेवरून घसरल्या" पाहिजेत ?
       --काय? ते तुम्हीच ओळखा !

(२)
खरेखुरे राजकारण पहावयाचे आहे ?
नेत्याचे "भाषण" ऐकावयाचे आहे ?
असे, सरळ या महाराष्ट्रात,
न-बोलता, नुसते साठवायचे आहे.

(३)
चार "अप-शब्द" मी बोलतो
आठ "अधिक-शब्द" तू बोल
आणि संध्याकाळी एकत्र बसून,
मिळून जनतेचा करूया गोल !

(४)
"भाषणाला" गर्दी होती अफाट
नेता करीत होता तोंडपाठ
पण प्रत्यक्षात "भाषण" देताना,
जीभ होती घसरत, "तोंड-फाट".

(५)
हमरी-तुमरीला आळा पडला होता
कुचकामी ठरतंय ते अस्त्र
वापरून नवी युक्ती  बदनामीची,
"तोंड-फाट्या" बाणाचे चालवताहेत शस्त्र.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2021-गुरुवार.