चारोळ्या-"घेऊन नेत्यांनी जन-जागृती दिंडी, अडविल्यात साऱ्या रस्त्यांच्या खिंडी"

Started by Atul Kaviraje, August 27, 2021, 02:08:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     विषय : नेत्यांची जन-जागृती दिंडी
                    वास्तव राजकारणी मार्मिक चारोळ्या
      "घेऊन नेत्यांनी जन-जागृती दिंडी, अडविल्यात साऱ्या रस्त्यांच्या खिंडी"
                                (भाग-१)
    -------------------------------------------------------------


(१)
काहीच विषय सुचत नाहीय
"राजकारण" करून नेते कंटाळलेत
चार-दोन कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन,
"जन-जागृती दिंडीत" अस्मादिक उतरलेत.

(२)
जनतेची झोप केव्हाच उडालीय
तिला कसली जाग आणताय ?
तिचे जागरणाचेच आहेत दिवस,
असेच "राजकारण" तुम्ही करताय !

(३)
गाऱ्हाणे कुणीच ऐकत नव्हते
तक्रारींकडे दुर्लक्षच होत होते
"जन-जागर दिंडीच्या" प्रयोजनापाठी चक्क,
निवडणुकीचेच वारे वहात होते.

(४)
PROBLEM SOLVE नाहीच होत
निवारण तक्रारींचे नाहीच होत
आश्वासने कमी पडलीत की-काय ?
म्हणून "दिंडी" निघत होती !

(५)
भोळी जनता, फसत होती
त्याच-त्याच नेत्यास निवडत होती
"जन-जागृती दिंडीच्या" पोकळ आश्वासनांनीच,
त्यांची झोळी भरत होती.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.08.2021-शुक्रवार.