म्हणी- "आचार भ्रष्टी सदा कष्टी "

Started by Atul Kaviraje, August 27, 2021, 11:21:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आचार भ्रष्टी सदा कष्टी "


                                         म्हणी
                                     क्रमांक -24
                               "आचार भ्रष्टी सदा कष्टी "
                             -------------------------


24. आचार भ्रष्टी सदा कष्टी
     ---------------------

--ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
-- एखाद्या व्यक्तीने / आपण जर एखादी चुकीची गोष्ट केली असेल तर त्याच /आपल अंतर्मन त्याला / आपल्याला सतत जाणीव करून देत असतं ,त्या व्यक्तीच्या /आपल्या मनाला शांतता नसते .
--अनाचाराने वागणारा माणूस सदा दु:खी असतो.
--ज्यांच्या कडे चांगले आचार विचार नसतात. ते  नेहमी दु:खी असतात .
--ज्या व्यक्तीचे आचार आणि विचार चांगले नसतात, तो नेहमी दुःखात असतो.
--ज्याचे विचार चांगले नसतील, तो नेहमीच दुःखी असतो.
--A person whose conduct and thoughts are not good is always sad.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                    -------------------------------------------

                            उदाहरण:-----
                           -----------   

     जो मनुष्य स्वधर्माप्रमाणें आपली वागणूक ठेवीत नाही त्यास नेहमी त्रास होतो
मनुष्यानें सदाचार पाळला नाही, धार्मिक विधिविधानांप्रमाणे वर्तन केले नाही, तर त्याच्या मनास कधी शांतता मिळत नाही. ''या घाणेरड्या पाण्यानें मी जास्त आजारी पडेन. ती ह्मणे, 'नाही रे बाबू! तीर्थानें स्नान केल्याशिवाय यात्रेचे पुण्य नाही. स्नानें काही होणार नाही.' हा वाद तेथेच आटपणार नाही असे पाहून तेथेहि तीर्थात हात बुचकळून कसे तरी दोन थेंब उडविल्यासारखे करून मार्जनविधि करू लागलो. शेवटी, 'आचार भ्रष्टी सदा कष्टी' हा मंत्र उच्चारून ती स्नानाला उतरली.''


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.08.2021-शुक्रवार.